अण्णा हजारेंच्या सुरक्षेची सरकारने अधिक काळजी घ्यावी
अहमदनगर, दि. 15, ऑक्टोबर - अण्णा हजारे यांनी नुकतीच केंद्र सरकारच्धात दिल्ली येथे मोठ्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे.तसेच आंदोलनाच्या अनुषंगाने हजारे येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण देशभ्र जनजागृती साठी दौरा करणार आहे.सध्या देशात समाजसेवकांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले असल्याच्या पाश्वभूमीवर सरकारने हजारे यांच्या सुरक्षे बाबत अधिक काळजी घ्यावी,अशी मागणी नगरमधील सामाजिक कार्यकर्ते अॅड.श्याम आसावा यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह मंत्रालय असल्याने अॅड.आसावा यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात एक निवेदन पाठविले आहे.निवेदनात म्हटले आहे की,देशाच्या विविध राज्यांमध्ये मागील 3 वर्षांमध्ये समाजसेवकांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले आहेत. नरेंद्र दाभोळकर,गोविंद पानसरे,कलबुर्गी यांच्या हत्या केल्यानंतर काही दिवसांपूुर्वीच बंगलुरू मध्ये ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांची देखील गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या सर्व हत्यांच्या संदर्भात अद्यापही कोणताही ठोस सुगावा पोलीसांच्या हाती लागू शकलेला नाही.विशेष म्हणजे समाज परिवर्तनासाठी लढा देणार्या या समाजसेवकांच्या हत्या झाल्यानंतर मोठा कालावधी झालेला असला तरी कोणत्याही हत्ये प्रकरणाचा तपास लागलेला नाही.अण्णा हजारे देखील याच पध्दतीने देशातील व्यवस्था परिवर्तनासाठी लढा देत आहे.हजारे यांनीनुकतीच दिल्ली येथील भावी आंदोलनाची घोषणा केली आहे.या आंदोलनासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानेच ते आता देशभर दौरा करणार आहेत.अण्णा हजारे यांना यापूर्वी देखील अनेक वेळा धमक्या आलेल्या आहेत.स्वत: अण्णा अशा प्रकारची सुरक्षा घेण्याच्या विरोधात आहेत.मात्र हजारे यांचे देशभरातील सामाजिक कार्य व देशासाठी असणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तीमत्व
याचा विचार करून सरकारने त्यांना अधिक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी अॅड.आसावा यांनी केली आहे.दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षकरंजनकुमार शर्मा यांनी हजारे यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून हजारे यांना सध्या झेड दर्जाची सुरक्षा तसेच स्थानिक पोलीसांचे संरक्षण देण्यात आल्याचे म्हटले आहे.मात्र तरीदेखील हजारे यांच्या कार्यकत्र्यांना त्यांच्या सुरक्षेविषयी काळजी वाटत असेल तर हजारे यांना आणखी सुरक्षा पुरविण्यात येईल,अशी ग्वाही पोलीस अधिक्षक शर्मा यांनी दिली आहे.