Breaking News

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास शेतक-यांचा वाढता प्रतिसाद

औरंगाबाद, दि. 15, ऑक्टोबर - नागपूर -मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेली जमीन शासनाने ठरवून दिलेल्या दराने शेतक-यांकडून खरेदी करण्यात येत असून या खरेदीला शेतक-यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. आज या खरेदी प्रक्रियेंतर्गत औरंगाबाद आणि वैजापूर तालुक्यातील एकूण 4 जमीन क्षेत्राची खरेदी करण्यात आली असून दगडू धनसिंग, अकुंश नरसिंग, नरसिंग गोपा, सतिश नरसिंग, जयसिंग हरी आणि मदन हरी या शेतक-यांनी आपली जमीन समृद्धी महामार्गासाठी शासनास विक्री केली. 
आतापर्यंत औरंगाबाद तालुक्यातील 51 खरेदीखत झाले असून त्याद्वारे 22.8137 हेक्टर क्षेत्र ताब्यात आले आहे. तसेच वैजापूर तालुक्यातील 52 खरेदीखत झाले असून त्याद्वारे 29.15 हेक्टर क्षेत्र ताब्यात आले आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक नोंदणी कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही खरेदी प्रक्रिया पार पडली. यावेळी संबंधति अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद तालुक्यातील एकूण 36 गावातून 435 गट शिवारातील 2638 खातेदारांच्या जमीनीतून समृद्धी महामार्ग जात असून याठिकाणी महामार्गाची एकूण लांबी 55 कि.मी. व 120 मीटर रुंदी असून या 36 गावांपैकी 33 गावांची संयुक्त मोजणी करण्यात आलेली असून उर्वरीत गावातील मोजणीचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये एकूण 1707 बाधीत खातेदार यांचे 570 हेक्टर 08आर.69 चौ.मी. क्षेत्र संपादीत होत आहे. शेतक-यांच्या संमतीने योग्य तो मोबदला देऊन शासन ही खरेदी करत असून औरंगाबाद जिल्ह्यातील ही संपूर्ण खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थितपणे होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे संबंधितांना योग्य त्या सूचना देऊन वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत.