Breaking News

बांधकामच्या अंगणात लाचखोरीची सार्वजनिक आतिषबाजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)दि. 17, ऑक्टोबर - महाराष्ट्र साबांतील लाचखोरी ऐरणीवर येऊन माध्यमांमधून पारदर्शक कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असतांना कारभारी माञ साविञीचं वाण वाटू लागल्याने या अनौरस पापाचा बाप कोण? असा गंभीर प्रश्‍न उपस्थित झाला आहे.सर्वदूर दिपोत्सवाच्या रांगोळीने आसमंंत उजळून निघत असताना साबांत भ्रष्टता,गैरव्यवहार आणि लाचखोरीचे फटाके फुटून पारदर्शकतेच अंगण सार्वजनिक असंगाच्या प्रदुषणाने काळवंडले आहे.मुःबई शहार इलाखाचा गैरव्यवहार असो नाहीतर नाशिक साबांतील लाचखोरी , या दोन्ही ठिकाणी मुख्य सुञधारांना वाचवण्याची भुमिका संशयास्पदच नाही तर  मंञालय सचिवालय,साबां मंडळाच्या बिळावर बसलेल्या नागोबांचे अभद्र हितसंबंध अबाधित ठेवण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्न केले जात आहेत.या दोन्ही प्रकरणात जे खरे संशयित आहेत त्याःच्या दालनापर्यत चौकशी पथकाचे हात पोहचणार नाहीत याची मुद्दामहून काळजी घेतली जात आहे. मुंबई शहर ईलाखात गाजत असलेल्या गैरव्यवहाराची मुळे कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात तर नाशिक साबांच्या लाचखोरीचे बीजं अधिक्षक अभियंता कार्यालयात रूजत असल्याचे माहीत असूनही त्यांचे निर्मुलन निर्दालन करण्या ऐवजी भ्रष्टतेच्या पोषण मुल्यांना वाव देण्याचा प्रमाद संबंधित यंञणेकडून सुरू आहे.अजूनही अवधी आहे,मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस आपल्या भुमिकेवर ठाम आहेत म्हणूनच मुंबई शहर इलाखा प्रकरणी आ.चरणभाऊ वाघमारे तर नाशिक साबां लाचखोरी विरूध्द दै.लोकमंथन स्वतः फिर्यादी म्हणून तपास यंञणांचे काम सोपे करतील यात कुठलीच शंका नाही.
शहर इलाखा प्रकरणी आ.चरणभाऊ वाघमारे होणार फिर्यादी
मुख्य संशयितांना अभय देऊन सहा अभियंत्यांना बळीचा बकरा बनविणार्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील पक्षपाती मंडळींना आ.चरणभाऊ वाघमारे यांनी थेट आव्हान दिले आहे.मनोरा आमदार निवास इमारत गैरव्यवहारात कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके याच मुख्य संशयिताच्या भुमिकेत आहेत यावर आ.चरणभाऊ वाघमारे ठाम आहेत.या संदर्भात आवश्यक ते सारे पुरावे या प्रकरणाचा तपास करणारे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांच्यासह साबांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, साबां मंञी चंद्रकांत दादा पाटील,मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन केले आहेत.चौकशी अंती हे पुरावे ग्राह्य धरून कारवाई करण्यात आली .माञ ही कारवाई नैसर्गीक न्यायाला धरूननाही.यावर आ.वाघमारे यांनी मुख्यमंञी फडणवीस यांच्यांशी संपर्क साधून सर्व प्रकार कथन केला आहे.या प्रकरणात दोन सह अभियंत्यांना निलंबीत केले गेले,यावरून प्रशासनाने गैरव्यवहार झाल्याची कबूली दिली.माञ या एकूण प्रकारात मुख्य भुमिका असलेल्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांना केवळ अकार्यकारी शिक्षा देऊन वाचविण्याचा डावखेळला गेला.निविदा काढणे,काम वाटप करणे,वर्क आर्डर काढणे बिल मंजूर करणे ,बील आदा करणे या सर्व बाबी कार्यकारी अभियंत्यांच्या परवानगीने आणि त्यांच्याच स्वाक्षरीने पार पडल्या आहेत.निलंबीत सह अभियंत्यांचा दोष होता तर कार्यभार सांभाळणार्या कार्यकारी अभियंत्यांनी तेंव्हाच त्यांचे कान उपटून कारवाई का केली नाही.त्यांनी सादर केलेले प्रस्ताव मंजूर

का केले.या सार्या बाबी कार्यकारी अभियंत्यांच्या भुमिकेवर संशय निर्माण करणार्या असतांनाही साबां मंञ्यांनी गैरव्यवहाराला अनियमितता ठरवून ,चौकशी  यंञणेने कारवाई करण्याची हतबलता दाखवून प्रज्ञा वाळके यांना अभय देण्याची कृती संशय अधिक गडद करते.याचाच अर्थ हे एकट्या कार्यकारी अभियंत्यांनी किंवा सह अभियंत्यांनी केलेला गुन्हा नाही तर या प्रकरणात या सगळ्यांचे संगनमत असून हा संघटीत कट आहे,असा आरोप आ.चरणभाऊ वाघमारे यांनी केला आहे.यात संगनमत करून संघटीतपणे बनावट दस्त तयार करणे ,शासकीय निधीचा अपहार करण्याचा कट करणे अशा गंभीर स्वरूपाच्या फौजदारी कलमांचा वापर करून गुन्हा दाखल करण्याची मागणी चरणभाऊ वाघमारे यांनी केली आहे.प्रशासनाने ही मागणी धुडकावली तर स्वतः फिर्यादी होऊन या दरोडेखोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची परवानगी मुख्यमंञ्यांकडे मागीतली आहे,परवानगी मिळो ना मिळो चरणभाऊ वाघमारे यांनी गुन्हा दाखल करण्याची अंतिम तयारी केली आहे.....
गुलमोहरच्या सावलीत पोसतेय नाशिक साबांतील लाचखोरी
नाशिक साबांचा सारा कारभार गुलमोहर या बांधकाम भवनच्या शासकीय निवासस्थानातून चालतो,हे या पुर्वीच्या अनेक प्रकरणातून निष्पन्न झाले आहे,सतिश मधुकर चिखलीकर प्रकरणातही गुलमोहरची झाडाझडती घेण्यात आली होती.यावरून नाशिक साबांच्या कार्यशैलीचे गुढ गुलमोहरच्या भिंतीआड दडले असून काम वाटपासून थेट देयके अदा करण्याचे धोरण याच गुलमोहरच्या शितल छायेत ठरत असल्यामुळे या वास्तूच्या आजूबाजूला कंञाटदारांपासून शाखा अभियंत्यापर्यत सर्वच कनिष्ठ वरिष्ठ साबां व्यक्तीमत्वांचा राबता असतो.माञ जेंव्हा या वास्तूचा दोष कार्यान्वित होतो तेंव्हा एखादी अघटीत घटना घडते.त्याचे फटके इतरांना बसतात.वास्तू आणि वास्तूपुरूष माञ अज्ञातच राहतात.यंदाच्या या लाचखोरीच्या अघटीततेत तसा या वास्तूचा कोपवगैरे झाला नसला तरी घटनेचे मुळ माञ गुलमोहरच्या आतपर्यंत गेल्याची कुणकुण बांधकाम भवनच्या अंगणात ऐकायला मिळते.
सहा लाखाची मागणी करून तीन लाख स्वीकारतांना देवेंद्र पवार,सचिन पाटील अजय देशपांडे हे तीन मोठे मासे गळाला लागल्याची चर्चा सुरू आहे.पण पकडले गेले ते खरे मोठे मासे आहेत का? या प्रश्‍नाचे उत्तर शोधले जात नाही.या सहा लाखाची एक वास्तव कथा आहे.तक्रारदाराकडे देयके मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी लाच मागीतली हे खरे आहेच.पण कुणाच्या सांगण्यावरून?गुलमोहर मधूनसुटलेले फर्मान अद्यापही चौकशी पथकाच्या रडारवर आले नाही.विभागीय कार्यालयाला बिले काढण्यासाठी निधी मंजूरीचा आदेश देतांना कार्यकारी अभियंत्यांकडे त्यांचे नजिकचे वरिष्ठ निर्लज्जपणे लाच मागतात.ही मागणी कार्यकारी अभियंत्यांमार्फत उप अभियंता,तेथून शाखा अभियंत्यांमार्फत कंञाटदारांपर्यत पोहचते.कालच्या लाच प्रकरणातही हीच साखळी कार्यरत होती म्हणून जे रंगेहाथ पकडले गेले तेच तेव्हढे चोर समजून होत असलेला तपास प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यास अडचणीचा तर आहेच पण तपास यंञणेने केवळ पाट्या टाकून नैसर्गीक न्याय नाकारण्याचे पातक केल्यासारखे होईल.यासाखळीचा अभ्यास करता लाचखोरीचा मुळ सुञधार कोण हे तपास यंञणेला वेगळे सांगण्याची गरज नसावी.
नाशिक साबां मंडळात गेल्या वर्ष भरात जवळपास 80 कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा साबांत ऐकायला मिळते.या गैरव्यहाराला कारणीभुत असलेल्याकिंबहूना गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत असलेल्या कामांची प्रशासकीय मंजूरी गुलमोहर मधूनच दिली गेली.या प्रकरणाचे सोलापुर कनेक्शन चर्चेत असून दोन खोके आणि कंञाटदाराची इनोव्हा एक गुढ बनले आहे.विद्यमान लाचखोरीच्या निमित्ताने  गुलमोहरच्या भिंतींना चिकटलेले गुढ उकलण्याचा प्रयत्न केल्यास लाचखोरीचे पितळ समुळ उघडे पडण्यास नक्कीच हातभार लागेल.