Breaking News

शिवाजी विद्यालयात दिवाळीनिमित्त फराळाऐजवी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप

बुलडाणा, दि. 18, ऑक्टोबर  - दिवाळीमध्ये विविध खमंग फराळाची सर्वत्र रेलचेल असते. स्थानिक शिवाजी विद्यालयात देखील दिवाळीच्या पर्वावर फराळाचे वाटप करण्यात आहे.  मात्र सदर फराळ हे खाद्य पदार्थांचे नव्हे तर वाचनाचे फराळ होते. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिनानिमित्त जगदंबा  सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
शिवाजी विद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक अरविंद देशमुख, सरपंचपती संजय काळे, माजी सरपंच संजय गवई, डॉ. अजय खर्चे,  संदीप चव्हाण, भारत ठेंग, वसंतराव निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. अजय खर्चे यांनी वाचनाचे महत्व विषद केले. संदीप चव्हाण यांनी विद्यार्थी जिवनात वाचनाची  गोडी जोपासावी असे आवाहन यावेळी केले.  मुख्याध्यापक देशमुख यांनी डॉ. कलाम यांच्या जिवनकार्याची माहिती दिली. यावेळी डॉ. अजय खर्चे व संदीप चव्हाण यांच्या वतीने  विद्यार्थ्यांना दिवाळीत वाचन्यासाठी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
सूत्रसंचालन अजय मिर्शा यांनी केले. यावेळी निलेश इंगळे, जाधव, प्रदीप कुर्हाळे, राजपूत यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.   तसेच जि. प. मुराठी पूर्व माध्यमिक शाळेत देखील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करुन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.