Breaking News

राज्य सरकार अंगणवाडी सेविकांचे हित जोपासणारे : श्‍वेता महाले

बुलडाणा, दि. 18, ऑक्टोबर  - देशाची भावी पिढी सुदृढ बनवण्याचे बहुमोल कार्य अंगणवाडी सेविका सर्मपण भावनेने व आत्मिक जिव्हाळ्याने पार पाडत आहेत. हे एक प्रकारचे  राष्ट्रकार्य आहे. मातृत्वाच्या भावनेतून सेवा देणार्‍या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबद्दल राज्य सरकार संवेदनशिल असुन त्यांच्या हिताची जाण राज्य सरकारला असल्याचे प्रतिपादन  जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती श्‍वेता महाले यांनी केले. 
आय.एस.ओ. अंगणवाडी, कुपोषणमुक्ती आणि मुलींच्या जन्मदर वाढीसाठी जि.प. महिला व बाल कल्याण विभागाने धडक कृती कार्यक्रम सुरु केल्याची माहिती श्‍वेताताईंनी या प्रसंगी  दिली. 13 ऑक्टोंबर रोजी अमडापूर येथे दोन नवीन अंगणवाडी केंद्राचे भूमीपूजन करतांना त्या बोलत होत्या. एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांतर्गत अमडापूर येथे दोन नवीन  अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने सर्व सोयी - सुविधांनी युक्त असलेल्या दोन्ही अंगणवडी केंद्रांसाठी 12  लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे. सदर बांधकामाचे भूमीपूजन श्‍वेता महाले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलतांना त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात राज्य  शासनाने समाधानकारक वाढ केल्याची माहिती दिली.
ग्रामीण भागात कार्य करणार्‍या या अंगणवाडी सेविकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सरकार येत्या काळात राबवणार असल्याचे त्या म्हणाल्या. महिला व बाल कल्याण विभागाक डून 36 लाख रुपये किमतीच्या 6 नवीन अंगणवाडी केंद्राचे बांधकाम लवकरच सुरू होत असल्याचे सौ महाले यांनी सांगितले. या शिवाय जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना आय. एस.  ओ. दर्जा मिळवून देणे, कुपोषण मुक्ती आणि मुलींच्या घटलेल्या जन्मदरात सुधारणा करण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने धडक कृती कार्यक्रम हाती घेतल्याचे श्रीमती  महाले यांनी सांगितले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ग्रामीण जनतेने व माता भगिनिंनी सक्रिय सहभाग नोंदवून लोकवर्गणीमध्येही सढळ हाताने योगदान द्यावे असे आवाहन श्‍वेताताई  महाले पाटील यांनी केले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या, शैलाताई डाळींबकर, पंचायत समिती सदस्या शमशेद बेगम पटेल, सरपंच, ललिताताई माळोदे, माजी जि.प. सदस्य,  श्याम पठाडे, माजी पं.स.सदस्य, प्रसाद देशमुख, शाहिद पटेल, बंडू माळोदे, युवा मोचार्चे प्रवीण देशमुख, शहराध्यक्ष दिलीप आढाव, प्रवीण खंडेलवाल, माधवराव देशमुख, दिलीप  खंदलकर, छाया पाखरे, ललिता खंदलकर, गजानन चोपडे, भारत खासबागे, धोंडू देवकर, राम देशमुख, जुबेर आलम, योगेश जुमडे, योगेश राऊत, माधव धुंदळे, प्रकाश खराडे,  गजानन वानखेडे, राजू बावणे, सचिव, दीपक गिरी यांच्यासह अंगणवाडी सेविका तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.