Breaking News

ग्रामीण शिक्षणाचा पाया कर्मवीरांनी रचला - शिंदे

अहमदनगर, दि. 02, ऑक्टोबर - रयत शिक्षण संस्था ही मुल्यांनी मोठी आहे. बहुजनांची संस्था आसल्याने सर्व जाती धर्माचे व विविध पक्षाचे लोक संस्थेत काम करीत आहेत. रयतेच्या शाखेत राजकारण न करता स्वच्छ भुमिकेतुन संस्थेत काम करा. ग्रामिण विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा पाया कर्मवीर अण्णांनी रोवला आसल्याने ग्रामिण भागातील विद्यार्थी शिक्षणाने मोठे होत आहेत. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन अड.भगीरथ शिंदे यांनी टाकळीभानच्या विद्यालयात आयोजित डा.कर्मवीर भाऊराव पाटील यांंच्या 130 व्या जयंती निमित्त कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलताना केले. मंचावर उत्तर विभागीय सल्लिगार मंडळाचे अध्यक्ष माजी आ.दादाभाऊ कळमकर, रयतच्या मनेंजिग कौन्सिलच्या सदस्या मीनाताई जगधने, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडु, जनरल बाडी सदस्य अड.विजयराव बनकर, प्रकाश निकम,बापुसाहेब पटारे, मंजाबापु थोरात, नानासाहेब पवार,राहुल पटारे , सरपंच रुपाली धुमाळ, पाराजी पटारे, दत्ताञय नाईक, भाऊसाहेब दाभाडे ,चिञसेन रणनवरे , राजेंद्र कोकणे ,आबासाहेब रणनवरे , नारायण काळे , दादासाहेब कोकणे , बोरावके महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे , डाकले महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण भोर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले कि, कर्मवीर अण्णांनी लावलेल्या या रोपट्याला आता शंभर वर्षे पुर्ण होत आहेत. त्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे.