Breaking News

तीन तालुक्यांच्या डोंगराळ भागात साखर कारखाना उभारू-धस

।  मच्छिंद्रनाथ गडावर विजयादशमी मेळावा, भाविकांची गर्दी

अहमदनगर, दि. 02, ऑक्टोबर - आष्टी, नगर व पाथर्डी तालुक्याच्या डोंगराळ व दुर्गम भागात जलसंधारणाची कामे होऊन पाणी पातळी  वाढली.याभागाला वरदान ठरू शकेल ,अशा ठिकाणी पुढील वर्षापर्यत साखर कारखाना सुरू होईल, याबतची अधीकृत घोषणा येत्या आठ दिवसात केली जाईल, अशी माहिती नियोजित साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक माजी मंत्री तथा मायंबा देवस्थानचे समितीचे मार्गदर्शक सुरेश धस यांनी दिली .
श्री क्षेत्र मायंबा येथे आयोजित दसरा मेळावात ते बोलत होते.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत बद्रिनाथ  महाराज तनपुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून रामदास महाराज कैकाडी, बबन महाराज बहिरवाल,म्हतारदेव महाराज आठरे, अशोक महाराज मरकड, पंढरीनाथ महाराज उंबरेकर आदी उपस्थित होते. गेल्या सहा वर्षांपासून मायंबा येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. आष्टी, नगर व पाथर्डी तालुक्याच्या पश्‍चिम भागातील भाविक येथे जमतात. नाथ संप्रदयाचे मुख्य स्थान म्हणून मायबांची ओळख आहे. .केंद्र शासनाकडून या आठवडयात परवानगी मिळून  त्याची अधिकृत घोषणा होऊन लगेचच कारखान्याची उभारणी सुरू होईल. मायंबापासून 20 ते 25 किलोमीटर परिसरात हा कारखाना होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ग्रमविकासमंत्री तथा बीड जिल्हाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष सहकार्याने रस्ते विकासाच्या सर्व कांमाना मान्यता मिळाली आहे. विकासाबरोबरच अध्यात्म्याच्या कामाकडे लक्ष  आहे. लवकरचमायिंबाच्या मुख्य समाधी मंदीराचे सुमारे दीड कोटीचे काम हाती घेतले जाणार आहे. पुढील दसरा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे उपस्थित करण्याचा मानस असल्याचे धस म्हणाले.उपस्थितांचे स्वागत देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, रांजेद्र म्हस्के यांनी केले तर  प्रास्ताविक प्रल्हाद म्हस्के यांनी आभार सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी मानले.