Breaking News

देशाचे नाव कराटे खेळामध्ये जागतिक स्तरावर उंचवावे : जिल्हाधिकारी

बुलडाणा, दि. 27, ऑक्टोबर - खेळ हा खेळाच्या भावनेने खेळावा लागतो. खेळामध्ये पराभव किंवा जय येतच असतो. खेळ कुठलाही असु द्या त्यासाठी जीव ओतून खेळाडूंना  मेहनत करावी लागते. जबाबदार नागरीक निर्माण करणे हा खेळाचा उद्देश आहे. कराटे या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा प्रथमच विदर्भात आणि तेही बुलडाण्यात होत आहे. या स्पर्धे तून राष्ट्रीय संघामध्ये खेळाडू निवडल्या जाणार आहे. तेथून जागतिक पातळीवर खेळ खेळल्या जाईल. अशा स्थितीत खेळाडूंनी कराटे खेळामध्ये देशाचे नाव जागतिक स्तरावर  उंचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. 
स्थानिक सहकार विद्या मंदीर येथील मैदानावर 26 ते 28 ऑक्टोंबर 2017 दरम्यान राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचे  आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमात  जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपिठावर क्रीडा उपसंचालक श्रीमती प्रतिभा देशमुख, महाराष्ट्र कराटे असोसिएशनचे अध्यक्ष बिशफ वाच्छा, सदस्य सुभाषचंद्र नायर, जिल्हा प्र तिनिधी फहीम सौदागर,  जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बाविस्कर, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त टी.ए  सोर, शेषनारायण लोढे, राजेश लहाने, मोहम्मद सज्जाद आदी उपस्थित होते.
कराटे स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील खेळाडू बुलडाणा जिल्ह्यात आले असून त्यांनी जिल्ह्याच्या जैवविविधतेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करीत जिल्हाधिकारी म्हणाले, खेळाडूंनी  खेळाडू वृत्ती जोपासावी. आपला नैसर्गिक खेळ प्रत्येकाने खेळला पाहीजे. त्यामुळे खेळाचा दर्जा उंचावतो. या स्पर्धेत चांगले यश मिळवून भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक ाला शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या. 
उपसंचालक श्रीमती देशमुख म्हणाल्या, प्रत्येक खेळाडूने पंचाच्या निर्णयाचे आदर केला पाहीजे. त्यामुळे निस्वार्थी खेळ भावना वाढीस लागते. खेळाडूने जिंकण्यासाठी प्रयत्नांची  पराकाष्ठा करावी, अपयश पचवून पुढे जाण्यासाठी खेळाकडे लक्ष केंद्रीत करावे. केवळ अपयश येते म्हणून खचून जावू नये. खेळाडूंना शासकीय नोकरीत पाच
टक्के आरक्षण आहे. राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार्‍या खेळाडूला शासन वर्ग एक पदाची नोकरी देते. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्र अशा चार टप्प्यांवर खेळाडूंनी लक्ष कें द्रीत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांन केले. त्यांनी स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. संचलन क्रीडा अधिकारी बी. आर जाधव यांनी तर आभार प्रदर्शन  अनील इंगळे यांनी केले. कार्यक्रमाला खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, सहकार विद्या मंदीरचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.