Breaking News

नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करा : राजेश इंगळे

अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा शिवसंग्रामचा इशारा 

बुलडाणा, दि. 27, ऑक्टोबर - कृषि उत्पन्न बाजार समिति देऊळगांव राजा येथे सोयाबिन ची आवक वाढली असून येथे अद्यापही शासनाचे नाफेड खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे  व्यापारी मनमानी भावाने शेतकर्‍यांची सोयाबीन खरेदी करत आहे.शेतकर्‍यांची व्यापार्‍या कडून होत असलेली आर्थिक पिळवणुक थाबविन्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड  मध्ये शासनाचे नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे,अशी मागणी आज शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी तालुका खरेदी विक्री संस्थेकडे  निवेदनाद्वारे केले आहे.
निवेदनात नमूद आहे की,यावर्षी पावसाचा अंदाज बरा आसल्याने शेतकर्‍याने मोठ्या उत्साहात सोयाबीन ची पेरणी केली आहे.मात्र ऐन सोयाबिनच्या शेँगा भरण्याच्या वेळी पावसाने  दगा दिला.एकरी दहा हजार रूपये शेतकर्‍यांनी खर्च केला आहे.सरासरी एकरी 2 ते 5 क्विंटल पर्यंत सोयाबिनचे पीक झाले.त्यातच शासनाने 3 हजार 50 रूपये हमी भाव ठरविला  आहे.मात्र येथील बाजार समिति मध्ये व्यापारी 1700 रुपया पासून ते 2400 रुपया पर्यंत प्रति क्विंटल सोयाबीन खरेदी करत आहे.नाफेड खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे व शेतकर्‍यांना  मुलींची दीवाली साजरी करण्याकरिता पैसे नसल्याने आपला माल मिळेल त्या भावात  शेतकरी व्यापार्‍याना विकत आहे. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक लुट होत आहे.अशा प्रकारे  शेतकर्‍यांची आवस्था असतांना खरेदी विक्री संस्थेचे संचालक व बाजार समितीचे संचालक आणि कर्मचारी मात्र या कडे दुर्लक्ष करत आहे.शेतकर्‍यांच्या हितासाठी बाजार समिति  संचालक मंडळ व खरेदी विक्री संस्थेचे संचालक मंडळ असते मात्र बाजार समितीच्या यार्डा मध्ये शेतकर्‍यांची व्यापार्‍या कडून लुट  होत असतांना येथील संचालक मंडळ सुस्त  आहे.त्यामुळे बाजार समितीच्या यार्डा मध्ये तात्काळ नाफेड मार्फत हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करा अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने खरेदी विक्री संस्थेच्या क ार्यालयामध्ये ठीय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर शिवसंग्राम तालुका अध्यक्ष राजेश इंगळे व तालुका संघटक जहीर खान पठाण  यांच्या स्वाक्षर्‍या आहे.