Breaking News

लायन्स क्लब खामगावतर्फे डॉ.मंजुश्री खोब्रागडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

बुलडाणा, दि. 01, ऑक्टोबर - स्व.श्रावण  बावस्कर गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ लायन्स क्लब खामगाव व धन्वंतरी चॅरीटेबल मेडीकल फाउंडेशनच्या संयुक्त  विद्यमाने देण्यात येणारा 2017 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बुलडाणा पंचायत समितीत कार्यरत असलेल्या साहित्यिक डॉ.मंजुश्री हर्षानंद खोब्रागडे यांना  जाहीर झाला. हा पुरस्कार आज 1 ऑक्टोबर रोजी खामगाव येथील नगर परिषद लायन्स आय हॉस्पीटल सेल्स टॅक्स ऑफीस समोर नांदुरा रोड येथील कार्यक्रमात  सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला  कृषी व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर, आ.अ‍ॅड.आकाश फुंडकर, एम.जे.एफ.लॉ. संदीप मालू, उपविभागीय अधिकारी  मुकेश  चव्हाण, नगराध्यक्ष अनिताताई डवरे, लॉ.अशोक केला यांची प्रमुख उपस्थिती राहील. या सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लॉ.उज्वल  गोयनका, लॉ.डॉ.अशोक  बावस्कर, लॉ.अभय अग्रवाल यांनी केले आहे.