Breaking News

काँग्रेस शहराध्यक्षपदी प्रविण कदम, ता.अध्यक्षपदी डॉ.धनोकार

खामगाव, दि. 01, ऑक्टोबर - काँग्रेस शहराध्यक्षपदी प्रविण कदम, तालुकाध्यक्षपदी डॉ. सदानंद धनोकार यांची तर प्रदेश प्रतिनिधी म्हणून माजी आ.दिलीप सानंदा  व रामकृष्ण पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. 
हळूहळू लोकांना आपल्या हातून झालेली चुक लक्षात येत असून सत्ताधार्‍यांचा विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. काँग्रेस पक्षाने पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी व  संघटनात्मक बदल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आगामी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसची एक सक्षम टिम तयार करण्यात आली असून ते आपल्या  पदाला प्रामाणिकपणे न्याय देतील त्यांच्यामुळे पक्ष संघटन अधिक मजबुत होईल असे प्रतिपादन माजी आ.दिलीप सानंदा यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या  निर्देशानुसार खामगांव शहर व तालुक्यातील बहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रदेब प्रतिनिधी व जिल्हा प्रतिनिधींची निवड 27 सप्टेंबर रोजी संत तुकाराम महाराज  सभागृहात पार पडली यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पक्षनिरीक्षक ऐफाज अहेमद व प्रकाब पोटफाडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी  नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष टाले, माजी सभापती राजाराम काळणे, न. प. काँग्रेस पक्षनेत्या सौ. अर्चनाताई  टाले, माजी जि. प. अध्यक्षा सौ. वषार्ताई वनारे, पं. स. सदस्या सौ. ज्योतीताई सातव, पं. स. सदस्य इनायतउल्लाखां, विठ्ठल सोनटक्के, नगरसेवक भुषण शिंदे,  नगरसेवक बेख फारुख बिसमिल्ला, विश्‍वपालसिंह जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.