Breaking News

ठाणेदार विनायक कारेंगावकर यांच्या मध्यस्तीने इसरूळ येथील स्मशानभूमीच्या वादाला पूर्णविराम!

देऊळगाव राजा, दि. 01, ऑक्टोबर -  इसरूळ येथील जिजाबाई गोपाळ बोर्डे ह्या मयत झाल्याने  त्यांच्या अंत्य विधी करण्यासाठी गावालगत स्मशानभूमी साठी  जागा मिळावी म्हणून या कारणाने गावातील बौद्ध समाजाणी एकजुटीने निर्णय घेत . जो पर्यंत स्मशानभूमी साठी जागा मिळत नाही तो पर्यंत अंत्यविधी करणार नाही  असा पवित्रा घेतला होता. शासनाने त्यांना गावापासून 3 की.मी.अंतरावर जागा दिली आहे परंतु पावसाळ्यात मात्र इतक्या अंतरावर जाने कठीन असल्याने गावालगत  जागा देण्यात यावी अशी मागणी समाज बांधव करत होते. 
म्हणून अंढेंरा पोलीस स्टेशन ठाणेदार विनायक कोरगावकर यांनी नायब तहसीलदार झालटे,पो.उपनिरीक्षक जंजाळ,सरपंच देवानंद गवते, यांच्या उपस्थित बौद्ध  समाजाची एक बैठक बोलावली व त्यांना मार्गदर्शन करत संगीतले जर कोणी समाज बांधव स्मशानभूमी साठी जागा देत असेल तर आपण पुढे पाठपुरावा करून  शासन निधीतून पुढील कामास सुरवात करू. हे ऐकताच गावातील समाज सेवक सुखदेव नामदेव बोर्डे हे आपल्या मनाची श्रीमंती दाखवत  सामोर आले व  स्वमालकीची 2 गुंठे जागा त्यांनी स्मशान भूमी साठी दान दिली. याच ठिकाणी मयत जिजाबाई बोर्डे यांचा अंत्यविधी पार पडला. ठाणेदार कोरगावकर व सहकार्‍यांच्या  प्रयत्नाने गावातील 4 वर्षा पासून सुरू असलेला स्मशान भूमीचा वाद संपूष्ठात आला.