Breaking News

तुझं माझं जमेना; सत्तेवाचून करमेना!

दि. 03, ऑक्टोबर - गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपतील मतभेद वाढत होते. शिवसेनेनं कितीही इशारे दिले, तरी तिला सत्ता सोडवत नाही, हे  भाजपच्या नेत्यांच्याही लक्षात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही एका पक्षाचे पंतप्रधान नसून, ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या मयताला जाण्याची  शिवसेनेच्या आंदोलनातील भाषा ही सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी आहे. शिवसेनेला जशी सत्ता सोडवत नाही, तसंच भाजपचं झालं आहे. चार लाथा पाठीत  घाल; परंतु माझ्यासोबतचा संसार मोडू नको, असा संदेश जणू भाजप सातत्यानं शिवसेनेला देतो आहे. 
बुलेट ट्रेन, रेल्वेचे अपघात, शेतकरी कर्जमाफी, परराष्ट्र धोरण, काश्मीरचा प्रश्‍न असो, की नोटाबंदी, जीएसटी; एकाही निर्णयाचे शिवसेनेनं सत्तेत राहून समर्थन  केलेलं नाही. एका ही गोष्टीवर जमेना, तरीही तुझ्यावाचून कर मेना अशी शिवसेनेची स्थिती आहे. त्याला कारणही भाजपपेक्षा शिवसेनेलाच सत्तेची जास्त गरज  आहे. सत्तेत राहायचं, सत्तेचे सर्व फायदे घ्यायचे आणि ज्या सरकारमध्ये आहोत, त्याच सरकारची बदनामी करायची, अशी दुटप्पी नीती शिवसेना राबवीत आहे.  वारंवार इशारे देऊनही प्रत्यक्षात शिवसेना मुंगळ्यासारखी सत्तेला चिकटून आहे. त्यामुळं शिवसैनिक आणि भाजपला ही मातोश्रीचा धाक राहिलेला नाही. शिवसेनेनं  एकीकडं मोदी यांना टीकेचे लक्ष्य करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत मात्र  ‘सॉफ्ट कॉर्नर’ ठेवला आहे. त्यांच्यावर फारशी टीका न करता त्यांच्याशी जुळवून घेण्याचं शिवसेनेचं धोरण आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपत पˆवेश द्यायला शिवसेनेचा विरोध होता. राणे यांना भाजपत प्रवेश दिल्यास सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत शिवसेनेनं  दिले होतेे; परंतु कितीही इशारे दिले, तरी शिवसेना सत्ता सोडणार नाही, याचा भाजपला विश्‍वास होता. राणे यांना भाजपात पˆवेश देऊन शिवसेनेला अकारण  अंगावर कशाला घ्यायचं, तसंच सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील भाजपच्या जुन्या नेत्यांना आणि संघालाही कशाला दुखवायचं, असा विचार भाजपनं केला असावा. राणे  यांना स्वतंत्र पक्ष काढून त्या पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणून मान्यता द्यायची तयारी भाजपनं दाखविली होती. राणे यांनी महाराष्ट्र  स्वाभिमानी पक्ष काढल्यानंतर लगेच त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामावून घेण्याचा निर्णय भाजपनं घेतला. राणे यांनी त्याला होकार दिला.  राणे यांचा  उद्धवद्वेष सर्वपरिचित आहे. बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव यांनीच सर्वांधिक त्रास दिला, असा आरोप राणे यांनी केला होता. त्यामुळं उद्धव दसरा मेळाव्यात राणे  यांना उद्धव  काय पˆत्युतर देणार, याची उत्सुकता होती. शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा करणार का, याकडं जनतेचं लक्ष लागलं होतं; परंतु राणे यांना  भाजपत थेट प्रवेश न दिल्यानं शिवसेनेचा भाजपविरोधातला राग आपोआप कमी झाला. राणे यांच्या टीकेला महत्त्व देऊन दात नसलेल्या वाघाला कशाला अंगावर  घ्यायचं, असा विचार उद्धव यांनी केला असेल. त्यामुळं उद्धव यांनी राणे यांच्या टीकेला अनुल्लेखानं मारले. शिवसैनिकाचा अपेक्षाभंग झाला असला, तरी सत्तेत  राहण्यसाठी हे अपरिहार्य होतं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सरकारचं काय करायचं, याबाबत शिवसेना पक्षपˆमुख उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत आणि ती  वेळ जवळ आली आहे’, असं सूचक टि्वट केलं होतं; परंतु संजय राऊत यांनी भाजपला अंगावर घ्यायचं आणि पक्षपˆमुखांनी आमदार, मंत्र्यांच्या दबावाखाली  सत्तेची झुल तशीच ठेवायची, अशा वागणुकीमुळं शिवसेनेला आता फारसं गांभीर्यानं कोणी घ्यायला तयार नाही. पेट्रोल-डिझेलचे भडकलेले दर, वाढती महागाई  आणि विझत चाललेल्या गरिबांच्या चुली या पापाचे धनी शिवसेनेला व्हायचं नाही, असं कारण राऊत यांनी दिलं होतं; परंतु सत्तेत सहभागी राहून शिवसेना त्या  पापाची धनी होत आहे, हे जनतेला कळत नाही, असं थोडंच आहे. जिथं राणे सत्तेत आहेत, तिथं त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत राहायचं नाही. शिवसेनेशी  गद्दारी करून बाळासाहेब ठाकरे यांना ज्यांनी दुखावले, त्या राणेंना कोणत्याही स्थितीत माफ करायचं नाही, अशी भूमिका वेळोवेळी उद्धव यांनी मांडलेली आहे;  परंतु भाजपचा मित्रपक्ष म्हणून राणे यांचा आता मंत्रिमंडळात समावेश अपरिहार्य आहे. त्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेनेचे मंत्री बसणार आहेत का, हा आता  खरा प्रश्‍न आहे.
दसर्‍याच्या अगोदरच्या एका बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी कामं होत नसल्याची तक्रार करून सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्याच एका  आमदारानं आपल्याच मंत्र्यांविरोधात तक्रार करंताना मुख्यमंत्री आपली कामं करतात, असं आवर्जून सांगितलं होतं. मराठवाड्यातील आमदारांनी सत्ता सोडू नका,  असा आगˆह धरला होता. शिवसेनेतली ही परस्पर विसंगतता वारंवार पुढं यायची. हे मुद्दाम तर केलं जात नाही ना, असा संशय व्यक्त केला जात होता. त्यातच  शिवसेना सत्तेतून बाहेर पडली,तर काही मंत्र्यांसह आमदारही शिवसेनेतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यामुळं तर शिवसेनेच्या सत्तात्यागाच्या  धमक्यांना भाजप कवडीचीही किंमत देत नव्हता. पक्षफूट टाळायची असेल, तर सत्तेचं गूळपीठ महत्त्वाचं आहे. त्यामुळं मुंबईतील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे  यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागताना राज्य सरकारमधून बाहेर पडण्याबाबत बˆ शब्दही काढला नाही. आम्ही सत्तेत रममाण  होत नाहीत, तर सत्ता राबवतो, असे त्यांनी शरद पवार यांच्या टीकेला पˆत्युत्तर देताना सांगितले; परंतु इशारे अणि कृती यांच्यातला फरक पाहिला, तर सत्तेत  जीव माझा रमला, अशीच उद्धव यांची स्थिती आहे, हे दिसते.