Breaking News

साईकृपा कारखाना जास्त भाव देऊन काटा पेमेंट करणार - पाचपुते

।  साईकृपा शुगर असिड  अलाईड इंडस्ट्रिजच्या अग्निप्रदिपन सोहळा उत्साहात 

अहमदनगर, दि. 02, ऑक्टोबर - तालुक्यातील साखर कारखान्याच्याबरोबर स्पर्धा करताना श्रीगोंदा व कुकडी या दोन सहकारी साखर कारखान्यांपेक्षा टनामागे  50 रुपये जास्त भाव  देऊन काटा पेंमेट देणार आहे, अशी घोषणा साईकृपा साखर कारखान्याचे अध्यक्ष सदाशिव पाचपुते यांनी केली. देवदैठण येथील साईकृपा शुगर असिड  अलाईड इंडस्ट्रिजच्या विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर दि.30  अग्निप्रदिपन सोहळ्याप्रसंगी ते बोल्ट होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. यावेळी अरुण हिरडे, कुशाभाऊ धावडे, सहादु सातव, रविंद्र शिंदे, अशोक ईश्‍वरे, रघुनाथ खामकर, देविदास थिटे, काशिनाथ कौठाळे, बाळासाहेब मांडे, हनुमंत गवळी, तुकाराम शिपलकर, प्रदिप मगर, पोपट ढूस, बाळासाहेब पवार, संदिप पवार, संतोष शिंदे, अश्रु खेडकर,  माऊली मगर, संतोष खेतमाळीस, मारुती औटी, सुदर्शन पाचपुते आदींसह ऊस उत्पादक, सभासद मोठ्या सख्यने उपस्थित  होते.
पाचपुते म्हणाले, अनेक संकटावर मात करीत कारखाना सुरु करीत आहोत. पण राजकारण बाजुला ठेवून कारखाना चालविणार. ज्यांनी काटा मारला ते शहाणे झाले. आम्ही मारला नाही म्हणून अडचणीत आलो. ऊसाचे प्रमाण कमी असले तरी दोन्ही कारखाने चालू  होणार आहेत. तालुक्यात बदल करायचा म्हणून केला. आज काय परिस्थिती आहे तीन वर्षे झाले तालुक्यात एकही विकासाचे काम नाही. पाण्याचे योग्य नियोजन लोकप्रतिनिधीनी केले नसल्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला. आमदार कुठे तर राज्याच्या बाहेर, काय करतात कुणी विचारले का?  असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले,  हंगाम चांगला झाल्यानंतर कामगारांना एक महिन्याचा पगार बक्षिस म्हणून देणार आहोत. शेतकर्‍यांना चालू हंगामातील ऊसाला टनामागे 50 रुपये आणि काटा पेमेंट देणार आहोत. माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, यंदा निसर्गाने चांगली साथ दिल्यामुळे सर्व अडचणींवर मात करून दोन्ही युनिट सुरु करीत आहे. यंदाचा हंगाम यशस्वी करून पुढच्या वर्षी 40 ते 50 लाख मेट्रिक टन ऊसाचे अतिरिक्त उत्पादन होणार आहे. शेतकर्त्यांनी पट्टा पध्दतीने ऊस लागवड केली आहे. अकरा लाखाचे दूध सकंलन साडेचार लाखावर गेले. तालुक्यात सर्वात जास्त सबस्टेशन उभे करुण वीजेची अडचन कमी केली आमदार नसताना नगर-दौड रसस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला. नदीपट्यात पाण्याचे नियोजन केले म्हणून श्रीगोंदा व कुकडीला ऊस मिळाला. लक्षण नलगे, मिठुभाई शेख, सचिन कातोरे, दिगांबर धोत्रे, अशोक ईश्‍वरे, रामा बोबडे, भाऊसाहेब कोळपे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक हिरामण पाटील यांनी केले. सुत्रसंचालन संतोष गुंड यांनी करुण विक्रमसिंह पाचपुते यांनी आभार मानले.