Breaking News

सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजातर्फे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

जळगाव, दि. 18, ऑक्टोबर - जळगावला अखिल भारतीय सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज मंडळाच्यावतीने समाजातील उप वर-वधू यांच्यासाठी भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी होणाछया उप वधू-वरांसाठी नोंदणी मोफत ठेवण्यात आली आहे. दि. 22 ऑक्टोंबर पर्यंत नोंदणी अर्ज भरण्याची मुदत देण्यात  आली आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोरील समाजाच्या मुख्य कार्यालयात रविवार, दि. 19 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता या परिचय मेळाव्याचे आयोजन क रण्यात आले आहे.
यासंदर्भात नुकतीच आयोजन बैठक घेण्यात आली. बैठकीला सुर्यवंशी क्षत्रिय मराठा महिला मंडळ जळगाव, भुसावळ, युवा मंडळ जळगाव, चिंचपुरा, भुसावळ परिसर मंडळ, पुणे  मंडळ, मुंबई मंडळ, धरणगाव मंडळ, शिरपूर मंडळ, मुसळी, साकळी, वराड, भडगाव, येथील स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी आले होते. सूर्यवंशी क्षत्रिय मराठा वृत्तपत्रचे प्रतिनिधी, साप्ता हिक तापी निर्माण आयोजन समितीचे प्रतिनिधी तसेच उपस्थित सर्वच बंधू भगिनी यांनी वधू-वर परिचय मेळावा भव्य स्वरूपाचा करण्याचा एकमुखी निर्धार केला आहे.
सदर मेळाव्यानिमीत्त एक वधू-वर परिचय पुस्तिका देखील तयार करण्यात येणार आहे. यासाठी समाज बांधवांनी रविवार दि. 22 ऑक्टोबर 2017 पर्यंत आपल्याकडील उप वधू- वरांच्या फोटोसह नोंदणी अर्ज जळगाव येथील कार्यालयात जमा करावे. तसेच समाज बंधू - भगिनींनी मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे  आवाहन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास पाटील, उपाध्यक्ष अंबादास महाजन, बी.बी.पाटील, किसन मराठे, सचिव दिलीप मराठे, कार्याध्यक्ष भरत काळे, सहसचिव संतोष सोनवणे,  सहकार्याध्यक्ष हरिभाऊ सोनवणे, प्रल्हाद पाटील तसेच संचालक मंडळाने केले आहे.