Breaking News

संभाजीराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहल्याबद्दल संजय राऊत यांचा निषेध

औरंगाबाद, दि. 18, ऑक्टोबर - शिव-सेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखापत्रातून राजे संभाजी यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केल्यामुळे पैठण  येथे विविध संघटनांच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला. शहरात संजय राऊत यांच्या प्रतिमेची व सामनाच्या अंकाची होळी करण्यात आली. राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी  करण्यात आली. यावेळी सतीश आहेर, कपिल पहीलवान, गणेश पवार, काका पाटील कानसे, किशोर सदावर्ते, पवन शिसोदे, आशिष मापारी, ज्ञानेश्‍वर जाधव, राम भाऊसाहेब पिसे  आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.