Breaking News

चंद्राबाबूनीं घेतली गडकरींची भेट; आंध्रप्रदेशातील प्रकल्पावर झाली चर्चा

नागपूर, दि. 18, ऑक्टोबर - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी आज, मंगळवारी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात भेट घेतली. यावेळी आंध्र प्रदेशचे  जलसंपदा मंत्री उमामहेश्‍वर राव देखील उपस्थित होते. आंध्र प्रदेशातील प्रदेशातील राष्ट्रीय सिंचन प्रकल्प आणि नदी जोड अभियानासंदर्भात चर्चेसाठी ते नागपुरात आल्याची माहिती  सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री नायडू यांच्यासह आलेल्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि वेगवान सिंचन लाभ कार्यक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेले 99 सिंचन  प्रकल्प लवकर पूर्ण् करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक आराखडा तयार केला आहे. यापैकी 23 प्रकल्प (प्राधान्य-1) 2016-17 पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत आणि अन्य  31 प्रकल्प (प्राधान्य-2) 2017-18 पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. उर्वरित 45 प्रकल्प (प्राधान्य-3) डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण केले जातील. केंद्र सरकारच्या या सिंचन प्रक ल्पांसाठी नाबार्डने 3 हजार 274 कोटी रुपये दिले आहेत. नाबार्डने पोलावरम सिंचन प्रकल्पासाठी आंध्र प्रदेशला 1981 कोटी रुपये, महाराष्ट्राला 830 कोटी रुपये, तर गुजरातला  463कोटी रुपये विविध सिंचन प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य म्हणून दिले आहेत.
एआयबीपीच्या 99 प्रकल्पांपैकी सर्वाधिक 26 प्रकल्प महाराष्ट्रात, आंध्र प्रदेशात 8 आणि गुजरातमध्ये एक प्रकल्प आहे. आंध्र प्रदेशातील सर्व आठ प्रकल्प प्राधान्य-2 गटातील  असून त्यामध्ये गुंडलाकामा, ताडीपुडी एलआसएस, थोतापल्ली, ताराकरम तीर्त सागरम, मुसुरुमिल्ली, पुष्कर एलआयएस, येराकल्वा आणि मादिगेडा यांचा त्यात समावेश आहे. या प्रक ल्पांच्या पूर्ततेसंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.