Breaking News

गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारणा कार्यक्रमाची अंमलबजावणी

बुलडाणा, दि. 18, ऑक्टोबर  - म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  ही योजना 2015 च्या सेवा हमी  कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. सन 2017-18 या वर्षासाठी या योजनेमध्ये पशुपालकांनी सहभाग घेवून आपल्या दुधाळ जनावरांची नोंद नजिकच्या पशुवैद्यकीय  संस्थेस पुरविण्यात आलेल्या विहीत नमुन्यात भरून त्यांच्यामार्फत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयास सादर करावी लागणार आहे.
नोंद झालेल्या दुधाळ जनावरांच्या पशुपालकाने एक एसएमएस केल्यास त्यांच्या दुधाळ जनावरांना लगेच नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत दुधाळ जनावराचे कृत्रिम रेतन के ल्या जाते व कृत्रिम रेतन केल्यानंतर जन्मलेल्या कालवडीना संगोपनार्थ प्रोत्साहनपर 5 हजार रूपयांचे व नर वासराला 25 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. तरी या  योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी  पशुपालकांनी आपला अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयास 27 ऑक्टोंबर 2017 पर्यंत पाठवावा. या योजनेक रीता गाय वाचवा व वंशावळ वाढवा, स्वस्थ्य पशु खुशहाल किसान, उत्पादक पशु संपन्न किसान अशी बोधवाक्य जाहीर करण्यात आलेली आहे.
तरी पशुपालकांनी आपल्या दुधाळ जनावरांची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. व्ही. बी जायभाये यांनी केले आहे.