Breaking News

लोकजागर परिवाराकडून बळीराजा स्मृती गौरव समारंभाचे 20 ऑक्टोबरला आयोजन

बुलडाणा, दि. 18, ऑक्टोबर  - सिंदखेड राजा तालुक्यातील लोकजागर परिवाराकडून शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर रोजी तढेगाव ता.सिंदखेड राजा येथे बळीराजा स्मृती गौरव  समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 
शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी बळीराजाचा इतिहास नव्या पिढीच्या मेंदूत जतन करण्याच्या उद्देशाने व एक दाण्याचे हजार दाणे करणार्‍या शेतकर्‍यांच्या पेरत्या हातांना वंदन करण्यासाठी  वंदन पेरत्या हातांना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेहकर तहसिलदार संतोषजी काकडे, प्रमुख मार्गदर्शक लक्ष्मणराव वडले, शेतकरी नेते र विकांत तुपकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात सिंदखेड राजा पंचायत समितीचे सभापती राजुभाऊ ठोके, पत्रकार रामदास कहाळे, दिपक कायंदे, सिद्धेश्‍वर  आंधळे, यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
लोकजागर प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच शोषित, पीडित, कष्टकरी, कामगार, शेत मजुर, अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना होईल तेवढी मदत करण्याचे कार्य अनेक  वर्षांपासून सुरु आहे. लोकजागर परिवाराचे प्रमुख विश्‍वस्त प्रविणजी गिते यांच्या संकल्पनेतून परिवारातील, नातेवाईकांचा, मित्र परिवारातील एखाद्या सदस्याचा वाढदिवस, प्रमोशन  किंवा एखादा लाभ झाल्यास त्या सदस्याकडून लोकजागर परिवाराला आर्थिक मदत केल्या जाते. या आर्थिक मदतीवर आजपर्यंत महाराष्ट्रभरातील विविध संस्थांना भरीव मदत कार्य  करण्यात आलेले आहे.