Breaking News

रा. ब. नारायणराव बोरावके यांची जयंती साजरी उत्साहात

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - येथील रयत शिक्षण संस्थेचे रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयात रा. ब. नारायणराव बोरावके यांची जयंती नुकतीच संपन्न झाली. 
धनत्रयोदशीचा योग साधून पार पडलेल्या या जयंतीप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व मराठी विभाग प्रमुख डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 2 लाख 51 हजार रुपयांची देणगी महा विद्यालयाला दिले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वार उभारणीसाठी दिलेल्या या रकमेचा धनादेश यावेळी डॉ. उपाध्ये यांनी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भागचंद चुडिवाल यांच्याकडे  दिला.
बोरावके जयंती व माजी विद्यार्थी संघटनेच्या या बैठकीसाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य विजयराव बनकर, प्रकाश निकम, आशिष बोरावके आदी मान्यंवर उपस्थित  होते.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेनेच आपल्याला उभे केले. त्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. मात्र, मला मिळालेल्या अंशःवाय मी या देणगीच्या रुपाने महाविद्यालयाला देत आहे,  असे भावोउद्गार बाबुराव उपाध्ये यांनी काढले. भागचंद चुडिवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कर्मवीरांच्या रयत मागील त्यागाची व त्याचे परीक अशा रा. ब. नारायणराव  बोरावके, डाकले, भास्करराव गलांडे परंपरेची आठवण करून दिली. ही परंपरा चालू ठेवण्यात बाबुराव उपाध्ये यांनी आपले योगदान दिले. त्याबद्दल त्यांचे आभार मानले. माजी  विद्यार्थ्यांनी आपले योगदान घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी अ‍ॅड. विजय बनकर यांनी ही आपले मनोव्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. उज्ज्वला भोर यांनी केले, तर प्रा. डॉ. अनुप दळवही यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या जयंती कार्यक्रमासाठी व माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे सर्व विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रतिज्ञा पतकी, प्रा. एकनाथ औटी या सेवानिवृत्त  प्राध्यापकांबरोबरच मोठ्या संख्येने प्राध्यापक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.