Breaking News

मराठवाड्यात एसटीच्या संपाला जोरदार प्रतिसाद, सर्वत्र प्रवाशांची गैरसोय

औरंगाबाद, दि. 18, ऑक्टोबर - कामगारांच्या संपामुळे मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद अशा सर्व जिल्ह्यात एस.टी. बससेवा  आज सकाळपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यातच मध्यवर्ती बसस्थानकात लावण्यात आलेल्या खाजगी बसेस एसटी कर्मचा-यांनी  पिटाळून लावले. एसटी कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. त्यास कर्मचा-यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने पहाटेपासूनच संपाचा परिणाम  जाणवला. मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकात सकाळपासूनच प्रवाशांचे हाल होत आहे. बहुतेक प्रवाशांना संपाची कल्पना नसल्याने त्यांनी चौकशी कक्षावर धाव घेत  आहे. परंतु बससेवा बंद असल्याची माहिती देण्यात येत आहे. एखादी तरी बस मिळेल या आशेने प्रवासी धडपडत करीत आहे. बस फे-या रद्द झाल्याने शेकडो प्रवासी तासनतास  बसस्थानकात खोळंबले.कर्मचा-यांच्या संपामुळे दिवाळीसाठी गावी जाणा-या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बसस्थानकात तासनतास थांबूनही बस जाणार नसल्याचे लक्षात  येताच प्रवाशांनी खाजगी बसचा रस्ता धरीत आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोर खाजगी बसच्या रांगा लागल्या आहेत. परंतु अशा परिस्थितीत खाजगी वाहतुकदारांनी जादा भाडे घेऊ न प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. शहर बससेवाही बंद- शहर बससेवाही बंद पाडण्यात आली. त्यामुळे शहरवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहर बस बंद रा हिल्याने रिक्षाचालकही प्रवाशांकडून जादा पैसे आकारत आहेत. बसस्थानकांत बसगाड्यांच्या रांगा- संपामुळे बसगाड्या बाहेर पडून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही बसस्थानक ांमध्ये बसगाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
पर्यटकांची कोंडी
एसटी बस संपामुळे अजिंठा लेणीजवळ आज पर्यटकांची कोंडी झाली आहे. पर्यटक केंद्रापासून लेणीपर्यंत घेऊन जाण्यासाठी असलेल्या इको बस बंद असल्यामुळे पर्यटक अडकून  पडले आहेत. अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी अनेक वर्षांपासून खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तेव्हापासून परिवहन महामंडळाच्या बसेसमधून पर्यटकांना नेले आणले  जाते. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी इको बस आणण्यात आल्या. आज बस संपामुळे लेणीकडे जाण्यासाठी अन्य सुविधा नसल्यामुळे मोठा गोंधळ सुझाला. पर्यटकांची ने-आण क रण्यासाठी काहींनी बैलगाडीची सोय केली. पण बैलगाडीवाले एका फेरीचे 500 रुपये घेत असल्यामुळे पर्यटक चिडले होते.