Breaking News

समाज व्यवस्थेला विचारण्याची मुलीत धमक पाहिजे : ले.महाडिक

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) : आपण बाहेर कसे दिसतो, याहीपेक्षा आतून कसे आहोत, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रस्थापित समाजव्यवस्थेला जाब विचारण्याची धमक मुलींमध्ये निर्माण झाली पाहिजे, अशी अपेक्षा लेफटनंट स्वाती महाडिक यांनी व्यक्त केली. सातारा तालुक्यातील जकातवाडी येथील यशवंतराव चव्हाण समाज कार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद कार्यक्रमात लेफटनंट महाडिक यांनी मनमोकळया गप्पा मारल्या. त्या म्हणाल्या प्रशिक्षण काळात केस कापल्यामुळे तुम्हाला कसे वाटले, याविषयी मला अनेक विद्यार्थिनींनी प्रश्‍न विचारला. आपण कसे दिसतो, याहीपेक्षा आपण कार्यकर्तृत्व सिध्द करतो हे महत्त्वाचे आहे. शिक्षिका ते लेफटनंट या प्रवासात मला माझ्यातील अनेक नवे पैलू अनुभवायला आणि पाहायला मिळाले. जिद्दी आणि वेगळं करुन दाखवण्याची धमक या दोन गोष्टीच भविष्यात उपयोगाला येणार आहेत. लेफटनंट स्वाती महाडिक यांची मुलाखत किशोर काळोखे यांनी घेतली. यावेळी लक्ष्मण माने, भाई माने  उपस्थित होते.