Breaking News

जातीयवाद ही समाजव्यवस्थेला लागलेली मोठी कीड : अ‍ॅड. रोठे

बुलडाणा, दि. 02, ऑक्टोबर - समाजव्यवस्थेला लागलेली सर्वांत मोठी कीड म्हनजे जातीवादातून निर्माण झालेली विकृत मानसीकता आहे. त्यामूळेच महापूरूषांचे विचार आणि अधीकारांचा स्वार्थासाठी दूरउपयोग घेनारी समाजव्यवस्था सकळ मानवतेला कलंकीत करीत असल्याचे प्रखर विचार प्रख्यात समाज प्रबोधनकार अ‍ॅड.सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केले.
ग्राम वडती बु.येथे 29 सप्टेंबरला नवयूवक सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने प्रबोधनकार अ‍ॅड. सतीशचंद्र रोठे यांच्या व्याख्यानाचे आयोजन सायंकाळी करन्यात आले होते.महापूरूषांच्या प्रतीमांना माल्यार्पण करून हभप क्रिष्णा महाराज झामरे,हभप माऊली महाराज तायडे,जलमित्र रामकृष्ण पाटील, सामाजीक कार्यकर्ते बळीराम पाटील,अनंता बिचारे,रवी पाचपोर यांच्या प्रमूख उपस्थीतीत दिपप्रज्वलन करून व्याख्यानाला सूरवात  करन्यात आली.
आपलें मनोगत व्यक्त करतांना अ‍ॅड. रोठे पूढे म्हनाले की, शिक्षणाची कास धरून समाज विघातक प्रवृतीचा सामूहीक प्रतीकार न केल्यास येनारी पिढी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मूकू शकते. जाती धर्मांचा कट्टरतावाद संपल्याशिवाय मानवता प्रस्थापित होऊच शकत नाही. यासह विविध सामाजीक ज्वंलंत प्रश्‍नांना हाताळत उपस्थितांना विचार करन्यास बाध्य केले. महिलांची लक्षनीय उपस्थीती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष दिलीप कोल्हे यांनी तर संचालन योगेश कोकाटे आणि आभार प्रविन कोल्हे यांनी मानले. क्रांतीकारकांना सामूहिक अभिवादन व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करन्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अनिल तायडे,अशोक पाटिल, दिपक कोल्हे यांच्यासह नवयुवक सार्वजनिक दूर्गा उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व वडती बु. समस्त गावकरी मंडळीने अथक परीश्रम घेतले.