Breaking News

ग्रा . पं . निवडणुका ; सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी धक्कादायक निकाल

सातारा, दि. 18, ऑक्टोबर - जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागत असून अनेक ठिकाणी परिवर्तन झाले आहे. माण तालुक्यातील मलवडीत दोन्ही गोरे  बंधुंना धक्का देत अपक्ष उमेदवाराने सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिरवळमध्ये भाजपच्या लक्ष्मी पानसरे विजयी झाल्या असून भुईंजमध्ये काँग्रेसने गड राखला आहे. 
माण तालुक्यात ‘हि‘ानगड‘ध्ये राष्ट्रवादीच्या संगिता मदने सरपंच म्हणून विजयी झाल्या असून राष्ट्रवादीने ही ग्रामपंचायत राखली आहे. तसेच पाचवड, मनकर्णवाडी, पांढरवाडी याठिक ाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. वावरहिरे, परकंदी, कासारवाडी, खुटबाव, महाबळेश्‍वरवाडी, नरवणे आदी गावांत काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. आंधळीत काँग्रेसच्या  मीनाक्षी काळे विजयी झाल्या आहेत. पांगरीत काँग्रेसचे दिलीप आवळे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले आहेत.
तसेच आसवली‘ध्येही सत्तांतर झाले आहे. भुईंज‘ध्ये काँग्रेसला नऊ तर राष्ट्रवादीला पाच जागा सुरूवातीच्या टप्प्यात मिळाल्या आहेत. कवठेत राष्ट्रवादी सहा तर काँग्रेस पाच तर  श्रीकांत वीर सरपंचपदी विराजमान झाले आहेत. काळंगवाडीत सरपंचपदासाठी समान मते पडली असून काँग्रेस व इतर पाच जागांवर असून राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या  आहेत. किकलीमध्ये भाजपसह इतर जवळपास इतर नऊ जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादीला 25 वर्षांनंतर प्रथमच पराभव पत्करावा लागला आहे.
खटाव तालुक्यात खातवळ येथे शिवसेनेच्या रेखा फडतरे सरपंच झाल्या असून राजाचे कुर्लेमध्ये समीरजित राजेभोसले विजयी झाले आहेत. ललगुणमध्ये काँग्रेस-भाजपचे जयवंत  गोसावी यांना गुलाला लागला आहे. तसेच फलटण तालुक्यात पिंपपरद, ताथवडा अन् चव्हाणवाडीत काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
आदर्की खुर्दमध्ये सौरभ निंबाळकर सरपंच झाले असून संजय व दिवाकर निंबाळकर गटाला सहा तर विश्‍वासराव निंबाळकर गटाला 3 जागा ‘ळिाल्या आहेत.
सातारा तालुक्यातील बहुतांश गावां‘ध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. तसेच मायणीसह अनेक गावांम‘ध्ये भाजपने निर्विवाद  सत्ता हस्तगत केली. मायणीत सतरापैकी दहा जागा दिलीप येळगावकर - सचिन गुदगे गटाने पटकावल्या .
दरम्यान, सातारा तालुक्यातील सोनगाव, जकातवाडी अन् कोपर्डेसह काही गावांमध्ये खासदार उदयनराजे भोसले गटाचा झेंडा फडकला. वडूजमध्ये जिल्हा परिषदेच्या सभापती वनिता  गोरे यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला असून म्हसवे गावात संजय शेलार केवळ तीन मतांनी विजयी झाले.
क्षेत्र माहुलीत सत्तांतर झाले असून राष्ट्रवादीच्या शिवेंद्रराजे अन् शशिकांत शिंदे गटाला आठ तर भाजपच्या संतोष जाधव गटाला सहा जागा मिळाल्या आहेत. अपशिंगेत शिवेंद्रराजे  गटाची सत्ता अबाधित राहिली असून गणेश देशमुख यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे.