Breaking News

एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

मेहकरमध्ये खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट

बुलडाणा, दि. 19, ऑक्टोबर - एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपात सामील होवून आपल्या एकजुटीचा परिचय देत सोमवारी मध्यरात्रीपासूनच संप पुकारल्यामुळे प्रत्यक्षात एसटी कामगार बेमुदत संपामध्ये सहभागी झाले. 
सदर संपाद्वारे कामगारांनी शासकीय वेतन निश्‍चिती करुन सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच 1 एप्रिल 2016 पासून सेवा ज्येष्ठतेनुसार एसटी कर्मचार्‍यांना राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांना मिळणार्‍या वेतन श्रेणी वेतन विविध मते सेवा सवलतीसह पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करणे व 1 जुलै 2016 पासून वाढीव सात टक्के महागाई भत्ता तसेच जानेवारी 2016 पासून चार टक्के महागाई भत्त्याची थकबाकी तात्काळ अदा करणे. तसेच बोनस प्रदान(सुधारित) कायदा 2015 नुसार मुळ वेतन महागाई भत्ता मिळवून 21 हजार पर्यंत वेतन असणार्‍या रा.प.कर्मचार्‍यांना बोनस देण्यात यावा. यासह इतर प्रलंबित मागण्यांची सोडवणूक करण्यात यावी. तसेच या संपामध्ये कामगार संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किसन बळी, इंटक युनियनचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य घायाळ, विभागीय कार्याध्यक्ष सतीश पाटील तेजनकर, डेपो अध्यक्ष मदन सोनेने, एस.पी.जाधव, एम.बी.पाटील, चांदणे, प्रताप आघाव, वायु तेलंग, सुनिल राठोड, काळे, मुळे, शकील खान, जाधव, राजगुरु, काळपांडे यांच्यासह इतर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्देशीय महासंघाचे मेहकर येथील तसेच राजे छत्रपती ड्रायव्हर युनियनच्या वतीने शिवाजीराजे तुपकर, दिलीप देशमुख, भगवान वाघमारे, कैलास चनखोरे मनोज गायकवाड, सुनिल जाधव, द्वारकादास जमधाडे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संपाला पाठिंबा दिला.