Breaking News

महावितरण कंपनी विरोधात काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा

बुलडाणा, दि. 19, ऑक्टोबर - महावितरण कंपनीच्या विरोधात धाड जिल्हा परिषद सर्कल तसेच धाड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. 
लोडशेडिंग कायम बंद करण्यात यावे, सिंगल फेसिंगवरील लोड शेडिंग बंद करावे, ज्या ग्रहाकाने विद्युत मिटर फौल्टी असल्याची तक्रार केली असेल अशाच ग्रहाकावर धाड टाकून त्याच्या कडून मनमानी पद्धतीने दंड वसूल केल्या जाते ते थांबवावे, धाड सर्कल मधील संपूर्ण गावांना पाणीपुरवठा करणार्या विहरिंना 24 तास विद्दुत पुरवठा करावा अशा मांगण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी धाड गावाचे सरपंच रिझवान सौदागर, ज्येष्ठ नेते प्रमोद बोर्ड, हाजी नईम खान, प्रभाकर वाघ, रमेश सणांसे, मोंढाला ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र जाधव, जांबचे सरपंच संजय सोनुने, दिलीप खांडवे, महेंद्र बोर्ड,अरविंद गुजर, प्रभाकर जाधव, झाकीर मौलाना, अनिस भाई, सय्यद अली चाचा, सलीम सौदागर, शिवाजी देशमुख, गजानन मरमट, राजू वाघ, बाळू शिंदे,पशशू सेठ, मो. शफी, गणेश भोंडे, नसरुल्ला मामू व असंख्य नागरिक उपस्थित होते.