Breaking News

शासनाच्या हेकेखोरपणामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल : आ.बोंद्रे

बुलडाणा, दि. 19, ऑक्टोबर - शासनाच्या हेकेखोरपणामुळे एैन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत आहेत, एस.टी. कर्मचार्‍यांनी वेळोवेळी केलेल्या मागण्यांकडे सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याने ही वेळ राज्यातील नागरीकांवर व प्रवाशांवर आली आहे, सरकारचा नाकर्तेपणा व हुकुमशाही वृत्तीच याला कारणीभुत आहे असे परखड मत बुलडाणा जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी व्यक्त केले. 7 वा वेतन आयोग लागु करावा यासह विविध न्याय मागण्यांसाठी चिखली आगारात कार्यरत सर्व राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी दिनांक 16 ऑक्टोंबर च्या मध्यरात्री पासून संप पुकारलेला आहे. या संपाचे पहिल्याच दिवसी बुलडाणा जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी चिखली आगारामध्ये दत्त मंदिर परीसरात ठाण मांडुन बसलेल्या संपकरी कर्मचार्‍यांशी संवाद साधला. त्यांच्या न्याय मागण्यांना संपुर्ण पाठींबा दर्शवीत गरज भासल्यास आपण कर्मचार्‍यांबरोबर त्यांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी रस्त्यावर उतरूण त्यांना सहकार्य करू असे यावेळी बोलतांना सांगितले.
सेवा जेष्ठता, पद निहाय वेतन श्रेणी, 7 वा वेतन आयोग लागु करणे, 01 जुलै 2016 पासून 7 टक्के महागाई भत्ता तर 01 जानेवारी 2017 पासून वाढीव 4 टक्के महागाई भत्याची थकबाकी एकरकमी अदा करण्यात यावी, सुधारीत कायदयानुसार बोनस, मुळ वेतन अधिक भत्ता मिळवून 21 हजार रूपये पर्यंत वेतन असणार्‍यांना बोनस देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी राज्य परीवहन मंडळाचे कर्मचारी संपावर गेलेले आहे. 40 दिवस आगोदर सुचना देवून सुध्दा प्रशासनाने कर्मचार्‍या प्रती असवेदनशिल भुमीका घेतली आहे. त्याबध्दल कर्मचार्‍यांच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात येती आहे. चिखली आगारातील आगार प्रमुख आणी आणी सहाय्यक वाहतुक अधिकारी वगळता सर्वच्या सर्व कर्मचारी संपात सहभागी आहे. संपात महाराष्ट्र एस.टी. वर्कस (इंटक) कामगार संघटना, कास्ट्रइब, महा नवनिर्माण सेना, महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन, कामगार सेना, यासह सर्व श्रमीक संघटनांनी सहभाग घेवून हा संप यशस्वी केलेला आहे. व मागण्या मान्य होई पर्यंत बेमुदत संप राहील असे संपकर्‍याकडून सांगण्यात आले आहे.
पुढे बोलतांना कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्या संदर्भात रितसर पुर्व सुचना शासनाला आणी प्रशासनाला दिली होती. त्यावर शासनाने गांभीर्याने विचार करून कर्मचार्‍यांच्या संघटनाशी चर्चा करायला हवी होती. जेणेकरून संपामुळे सर्व सामान्य प्रवाशांना त्रास सहन करण्याची वेळ आली नसती, अजुनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे तातडीने उपाय योजना करीत प्रवाशांचे हाल थांबविण्यासाठी संप मागे घेण्यासंदर्भात कर्मचार्‍यांच्या संघटनाशी चर्चा करून व कामगारांना न्याय देवून संप मिटविता येईल, त्यांच्या मागण्या रास्त असल्याने आम्ही कर्मचार्‍या बरोबर आहोत आणी राहु असे आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी आगारात उपस्थित कर्मचार्‍यांशी संवाद साधतांना स्पष्ट केले.  यावेळी बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, माजी तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर, बाळु महाजन, तुषार भावसार, विलास चव्हाण, तसेच एस.टी. विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी चालक, वाहक मोठया संख्येने उपस्थित होते.