Breaking News

शेत मजुराची आत्महत्या

चांडोळ, दि. 01, ऑक्टोबर - येथील गंफार खा नजिब खा पठाण (वय 45 वर्षे) या  शेतमजुराने गावाशेजारील शेतात गुरुवारी सकाळी गळफास  घेऊन आत्महत्या  केली. गफार खा नजिब खा यांनी    चांडोळ गावालगत असलेल्या शे तकरी प्रल्हाद सांडुसिंग बारवाले यांच्या शेतात गट नं. 125 मध्ये  निंबाच्या झाडाला दोरीच्या  साह्याने गळफास घेऊन आत्महत्या  केली. गावातील नागरिकांना गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या  दरम्यान आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.  त्यानंतर एकच   खळबळ उडाली. गफार खा नजिब खा यांचे भाऊ आसीब खा नजिब खा यांनी  धाड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून धाड  पोलीस स्टेशनचे  ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली   पंचनामा केला. पुढील तपास  पोलीस करीत आहेत.