Breaking News

साबां लाचखोरीच्या तपासात एसीबीची भुमिका संशयास्पद


नाशिक (विशेष प्रतिनिधी), दि. 18, ऑक्टोबर - सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार,सह अभियंता सचिन पाटील आणि शाखा अभियंता अजय देशपांडे  यांना जिल्हा सञ न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.शुक्रवार दि.13 आक्टोबर रोजी कंञाटदाराकडून तीन लाख रूपयांची लाच  घेतांना या तिघांना एसीबीच्या पथकाने  रंगेहाथ पकडले होते.मंगळवार दि.17 आक्टोबर पर्यंत देण्यात आलेली पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना जिल्हा सञ न्यायाधिश गणेश देशमुख यांच्या समोर उभे करण्यात  आले होते.आजवर झालेला तपास,जप्त केलेली मालमत्ता या बाबींचा परामर्श घेतल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
या प्रकरणात न्यायिक पातळीवर सारे काही रितसर असले तरी न्यायालयीन निर्णय हे प्राप्त पुरावे,तपास यंञणेने सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे,तपासाची गती,दिशा आणि  न्यायालया समोर सादर केलेला रिमांड रिपोर्ट यावरच न्यायालयीन कामकाजाची भिस्त असते,या प्रकरणात तपास यंञणेविषयी पहिल्या दिवसांपासून संशय व्यक्त केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात सापळा लावून एसीबीने पकडलेले कार्यकारी अभियंता यांच्या मागे सत्ताधारी मंडळींचे पाठबळ उभे असल्याने तपासाची दिशा बदलली गतीही थंडावली  असे आरोप होऊ लागलेत.तपास यंञणा कितीही नाकारत असली तरी याच बांधकाम भवन मधील चिखलीकर प्रकरणात झालेला तपास आणि विद्यमान तपासाच्या गतीत असलेला  फरक या गोष्टीवर प्रकाश टाकतो.सतिश मधूकर चिखलीकर या कार्यकारी अभियंत्याने केवळ वीस हजार रूपये लाच स्वीकारल्याचा आरोप होता,तरीही सापळ्यात अडकल्याच्या  दुसर्या तासापासून  ठिकठिकाणी छापेबाजी करून करोडोची मालमत्ता जप्त करण्यात एसीबीला यश मिळाले होते.माध्यमांनाही एसीबीकडून वेळोवेळी अपडेट दिली जात होती.त्या  तुलनेत विद्यमान प्रकरणात लाचेची रक्कम तब्बल पंधरा पट असतानाही तपासात गांभिर्य दिसले नाही उलटपक्षी जणू काही झालेच नाही इतक्या सहजपणे या तपासाची गती  होती,त्याचे कारण राजकीय दबाव असल्याचे सांगीतले जाते.या प्रकरणात राजकीय दबाव आहे या शक्यतेला तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारी अर्जावरून मिळतो.एसीबीला टीप  दिली म्हणून तक्रारदाराला राजकीय मंडळींकडून धमक्या दिल्या जात असल्याचा अर्ज तक्रारदाराने पोलीस आयुक्तांना दिला आहे.या अर्जावर नाशिक शहर पोलीस काय भुमिका  घेतात यावर राजकीय दबावाची तिव्रता तपासणे शक्य होईल.
यायालयीन आवारात साबां- कंञाटदार गोतावळ्याची गर्दी
या तिन्ही साबां अभियंत्यांना मंगळवारी न्यायालयात आणले असता नाशिक बांधकाम भवनचे अनेक अभियंता ,कंञाटदार या संशयितांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आवर्जून उपस्थित  होते.ही सांख्या एव्हढी लक्षणीय होती की उपस्थितांच्या देहबोलीने तपासी अमलदारावर त्याचा अपेक्षित प्रभाव पडणे स्वाभाविक व्हावे.या घटनेतून हे तिन्ही अभियंते एकतर बांधकाम  भवनमध्ये अन्य अभियंता आणि कंञाटदारांमध्ये लोकप्रिय असावेत किंवा या प्रकरणाच्या भवितव्यावर अन्य मंडळींच्या भवितव्याची परिक्षा घेतली जाण्याची भिती मनात असावी असा  अंदाज बांधला जातोय.
नाशिक पोलीसांची भुमिकाही आता महत्वाची
शहरातील गुन्हेगारी मोडीत काढतांना नाशिक पोलीसांनी वेगवेगळे प्रयोग राबविले,त्यापैकी गुन्हेगारांची राजकीय आश्रय स्थाने शोधून त्यांना उघडे पाडण्याचा उपक्रम कमालीचा  यशस्वी ठरला.गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या संशयावरून काही राजकीय मंडळींची चौकशी सुरू झाल्यानंतर बर्यापैकी गुन्हेगारी कमी झाल्याचे चिञ शहरात दिसले.
साबां लाच प्रकरणातही तक्रारदाराला राजकीय मंडळींकडून धमक्या येत असल्याची तक्रार नाशिक पोलिसांत दाखल झाली आहे,याचाच अर्थ गुन्हेगारांना वाचविण्यासाठी राजकीय क नेक्शन पुन्हा एकदा गुन्हेगारी पध्दतीचा अवलंब करू लागल्याचा हा पुरावा आहे.यातील तथ्य शोधून गुन्हेगारीचे हे नवे कनेक्शन शोधण्याची आणखी एक संधी नाशिक पोलीसांना  आहे.पोलीसांच्या या तक्रार अर्जा संंबंधीच्या भुमिकेवर या प्रकरणात खरोखर राजकीय दबाव किती आहैहे याचा उलगडा होणार आहे.