Breaking News

‘राष्ट्रवादी’चे शरद पवार यांनी जगताप कुटुंबियांचे केले सांत्वन

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - कुकड़ी सहकारी साखर कारखान्याचे स्वप्न पूर्ण करुन सहकारी तत्वावर उत्कृष्ठ रित्या साखर कारखाना चालवणारे कुंडलिकराव जगताप यांची  तब्येत ठिक नव्हती. मात्र तरीही एका जागेवर बसुन राजकारणाची आणि कारखान्याची घडी बसविण्याचे काम त्यांनी केले. कुंडलिकराव जगताप यांच्या निधनाने श्रीगोंद्याच्या राजक ारणात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. 
कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी पिंपळगाव पिसा येथे आमदार राहुल जगताप  यांच्या निवासस्थानी जाऊन जगताप परिवाराचे सांत्वन केले.
 यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार संग्राम जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, दत्तात्रय पानसरे, अण्णासाहेब शेलार आदि उपस्थित होते.
माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील म्हणाले, कुंडलिकराव जगताप हे जिल्हयाच्या राजकारणात वचक असणारे दिग्गज नेते होते.  त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची  मोठी हानी झाली आहे.