Breaking News

तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी तोंड वाजवण्यापेक्षा काम दाखवावे - काळे

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - या कोपरगाव तालुक्याच्या जनतेने तुमच्याकडे पंचायत समिती ठेवली नाही, कोपरगावचे नगराध्यक्षपद तुमच्याकडे ठेवले नाही, तुमचा एक  जिल्हा परिषद सदस्य सुद्धा निवडून दिला नाही याची जान ठेवा. अल्पशा यशाने हुरळून जावू नका.नुसते तोंड वाजवीत बसण्यापेक्षा विकास करून दाखवा असे सडेतोडर आव्हान क र्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना केले. जनसुविधा  योजने अंतर्गत 15 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कुंभारीच्या नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उदघाटन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत  होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती अनुसया होन  होत्या. 
ते पुढे म्हणाले की, विकासाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो. आम्ही एकत्र आल्याचे कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आवडले असल्यामुळे जिल्हा परिषद व  पंचायत समितीमध्ये अभूतपूर्व यश मिळाले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संमिश्र यश मिळाले. विरोधकांना थोडे चांगले यश मिळाले पण या यशाने ते हुरळून गेले  आहे. आमचा पॅटर्न हा विकासाला चालना देणारा आहे राजकीय खोडा घालणारा नाही. माजी आमदार अशोकराव काळे यांनी 35 वर्षाच्या रखडलेल्या विकासाला चालना देतांना  विकासाची सुरुवातच कुंभारी गावातून केली. पण आज कोपरगाव तालुक्याची परिस्थिती काय आहे. मागील 35 वर्षात जो कोपरगाव तालुका होता तीच परिस्थिती आज कोपरगाव  तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यासाठी तोंड वाजवीत बसण्यापेक्षा विकास करून दाखवावे असे आव्हानच  तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना केले. मंजूर के.टी. वेअर फुटून जवळपास  10 दिवसाचा कालावधी उलटून गेला. हा बंधारा फुटल्यामुळे बंधा-याच्या लगत असलेल्या शेतक-यांच्या जमिनी उभ्या पिकासह वाहून जावून या शेतक-यांचे मोठे  नुकसान झाले.  त्यामुळे या शेतक-यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. एवढे होऊनही तालुक्याच्या लोकप्रतिनिधी तिकडे फिरकल्याच नाहीत. हार तुरे घेण्याच्या नादात आपण संपूर्ण तालुक्याच्या  लोकप्रतिनिधी आहोत याचाच विसर त्यांना पडला आहे.
 याप्रसंगी राघवेश्‍वरनंदगिरी महाराज, सभापती अनुसया होन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सुधाकर दंडवते, पंचायत समितीचे उपसभापति अनिल कदम, गटविकास अधिकारी के.आर कलोडे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष व कोळपेवाडीचे नवनिर्वा चित सरपंच सूर्यभान कोळपे, पंचायत समिती सदस्य अर्जुनराव काळे, संचालक अरुण चंद्रे,  सरपंच सौ. मथुराबाई कबाडी, माजी पंचायत समिती सदस्या सौ. स्वप्नजा वाबळे, रो हिदास होन, गौतम बँकेचे संचालक साहेबलाल शेख, जगन्नाथ वारुळे, प्रशांत वाबळे  आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना  उपसरपंच शिवाजीराव घुले यांनी कुंभारी गावात जवळपास 80 लाख रुपयांचे विकास कामे केले असून 15 ते वीस लाख रुपयांचे विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात  आले असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन वाल्मिक नीळकंठ यांनी केले तर आभार आण्णासाहेब बढे यांनी मानले.