Breaking News

काँग्रेसची निवड प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - अहमदनगर शहर व जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडी लवकरच होणार असून यासाठी सर्वच आजी-माजी  पदाधिकारी पुढे सरसावले आहे. शहर  आणि जिल्हाध्यक्षदासाठी निवडणुका होणार असल्या तरी शहरातील संघर्ष उफाळून येण्याची शक्यता दिसत असल्याने कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.  काँग्रेसच्या होणार्‍या  यंदाच्या निवडी ह्या वरिष्ठ पातळीवरुन होणार. तसेच दोन्ही निवडी ह्या 19 नाव्हेंबर पर्यंत जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरातील राजकीय वातावरण कायमच विखे आणि थोरात यांच्या अवतीभोवती फिरत असते यातून कोणत्या गटाचा जिल्हाध्यक्ष करायचा यावरुन वादंग निर्माण होत असे. याचीच  ‘रि’ही यंदा शहराध्यक्षपदासाठी ओढली जाणार का? जिल्हा आणि शहरातील अध्यक्षांच्या निवडी अगोदर अनेकांनी आपली फिल्डींग लावली आहे. अनेकांनी आपला ताकद दाखवुन  देण्यासाठी सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात करुन घेतली आहे. यावेळी वरिष्ठ पातळीवरून निवड होणार असल्याने कोणतेही मतभेत नाहीत याची काळजी घ्यावीच लागणार आहे.  जिल्ह्यात कितीही नाही म्हटले तरी विखे-थोरात एकत्र आल्याशिवाय या निवडणुका संघर्षविना होऊ शकतील, असाच अंदाज कार्यकर्त्यांकडून व्यक्त जात आहे.