Breaking News

ऋषीकेश मुखर्जी हे हिंदी चित्रपटांमधील विनोदी शैलीचे समर्थ सादरकर्ते - कुंदन शहा

पुणे, दि. 02, ऑस्टोबर - दिवंगत दिग्दर्शक ऋषीकेश मुखर्जी यांच्या जन्मदिनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटच्या (एफटीआय) वतीने स्मरणांजली  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक कुंदन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहा यांनी मुखर्जी यांच्याबद्दल  अनेक आठवणींना उजाळा दिला.
स्मरणांजली कार्यक्रमाला संचालक भुपेंद्र कँथोला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चालणार्‍या कार्यक्रमात ऋषीकेश मुखर्जींनी दिग्दर्शित केलेल्या  चुपके चुपके, आनंद, गुडीया चित्रपटांवर चर्चासत्रे होणार आहेत. यावेळी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक कुंदन शहा यांनी ’मुखर्जी हे विनोदी शैलीचे हिंदी चित्रपटांमधले  समर्थ सादरकर्ते दिग्दर्शक होते. काही सन्माननीय अपवाद वगळता आजचे तथाकथित विनोदी चित्रपट बघितले तर प्रेक्षकांकडून हशा वसूल करायला  आचकट-विचकट हावभाव, विचित्र अंगविक्षेप किंवा सरळ सरळ घाणेरडी भाषा यांचा प्रामुख्याने आधार घेतलेला आढळतो असे सांगितले.