Breaking News

विदर्भात फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे आतापर्यंत 18 शेतक-यांचा मृत्यू

यवतमाळ, दि. 02, ऑस्टोबर - विदर्भात पिकांवर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे आतापर्यंत 18 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर  असल्याचे सांगण्यात येत आहे. 
मागील तीन महिन्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिकांवर किटकनाशक फवारणी करताना 369 शेतक-यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामधील 7  शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. यामधील 6 शेतकरी व्हेंटिलेटरवर आहेत. विषबाधेमुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाच्या कमतरेतमुळे कपाशी आणि सोयाबीन या पिकांवर किडींचा मोठ्या प्रमाणात पादुर्भाव झाला आहे. त्यामुळे किडींपासून पिकमुक्त करण्यासाठी शेतकरी  किटकनाशकांचा वापर करत आहेत. फवारणीवेळी किटकनाशकांचा योग्यरितीने वापर न केल्यामुळे विषबाधा होत आहे.