Breaking News

जमियत व आयजीसीतर्फे दिनियातच्या परिक्षेचा निकाल घोषीत

बुलडाणा, दि. 17, ऑक्टोबर - येथील जमियत अहले हदिसच्या वतीने प्रेषीत मुहम्मद (स)सहाबा- ए-कराम वर आधारीत दिनियातची परिक्षा 26 ऑगष्ट रोजी घेण्यात आली होती.  या परिक्षेचा निकाल शनिवारी जाहिर करण्यात आला आहे. या परिक्षेत नमिरा शकील खान हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. 
मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो करतो तो तितकाच याशायाच्या शिखरावर जाऊन बसतो  शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भू मिका बजावू शकतात त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणार्‍या शालेय शिक्षणाची आता देशाला गरज आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला  जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असे प्रतिपादन रईस काझी यानी केले. उर्दु हायस्कुल येथे आयोजीत  पुरस्कार वितरण सोहळयाच्या अध्यक्षस्थानावरुन रईस काझी बोलत होते. प्रशासन अधिकारी रईस काझी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर मुख्याध्यापक जावेद खान, शब्बीरखान,  शेख काशीफ, उमरदरास कुरेशी यांची उपस्थिती होती. जमिअत अहले हदिसच्या वतीने दिनियात परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील उर्दु हायस्कुल, अब्दुल हमीद  उर्दु हायस्कुल, मौलाना आझाद उर्दु हायस्कुल, हाजी सय्यद डोंगरे उर्दु हायस्कुल व गुलोबलीज स्कुलच्या जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांनी या परिक्षेत सहभाग घेतला होता. विशेष  म्हणजे जमिअत अहले हदिसच्या वतीने विद्यार्थ्यांना दोन महिन्यापुर्वीच परिक्षेचे पुस्तके देण्यात आली होती. या पुस्तकाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली आहे. या प रिक्षेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला असून त्यामध्ये पहिल्या गटात प्रथम क्रमांक नमिरा शकील खान हिने प्राप्त केला असून व्दितीय क्रमांक इफत फातेमा, तृतीय क्रमांक  नमिरा शेख शकील, बझीमा मो. नासीर, सबाहत शेख मुजीब्रुरहेमान, बुशरा रहमान यांनी पटकाविला आहे.
प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास लॅपटॉप तर व्दितीय क्रमांक प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यास टॅब व तृतीय क्रमांक पटकावणार्‍या विद्यार्थ्यास पॅन कुरआन ग्रंथाचे तर यशस्वी विद्यार्थ्यांना  मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी जमियत अहले हदीसचे अध्यक्ष उमैर देशमुख, आयजीसीचे अध्यक्ष अब्दुल रहेमान, कामरान खान, मोसीन शेख,  आसीम शेख, झोएब अहेमद, जाकीर अली, झीशान खान, रशीद शेख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मौलाना युनूस फैज़ी यांनी तर आभार प्रदर्शन मिनाज़ खान यांनी  केले.