Breaking News

ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानची अशीही सामाजिक बांधिलकी

ठाणे, दि. 17, ऑक्टोबर - दिव्यांग मुलांसाठी सण-उत्सव म्हणजे चार भिंतीमध्ये आपल्या पालकांसोबत साजरा होणारा क्षण.मात्र,ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजप  उपाध्यक्ष डॉ.राजेश मढवी यांनी या विशेष मुलांसाठी एक पहाट आपुलकीची हा दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करून वेगळी सामाजिक बांधिलकी जपली आहे. बुधवारी 18 आ ॅक्टोबर रोजी सकाळी घंटाळी,साईबाबा मंदिर येथे हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम रंगणार आहे.यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे.
शारीरिकदृष्ट्या अपंग,मुकबधीर अथवा विशेष मुलांचे विश्‍व खरे तर घर ते शाळा इतकेच असते.बौद्धिकदृष्ट्या वाढ खुंटल्याने दिव्यांग मुलांना पालकांवर अवलंबून राहावे  लागते.तरीही,आजकाल दिव्यांग मुले विविध सामाजिक उपक्रमामधून सहभागी होत असतात.तेव्हा,अशा मुलांना शहरातील दिवाळीतील दिव्यांचा झगमगाट,सुरेख रांगोळ्या,रंगीबिरंगी कं दील आणि फटाक्यांची आतषबाजी अनुभवता यावी यासाठी डॉ.राजेश मढवी यांच्या गौरव प्रतिष्ठानच्यावतीने दिव्यांगासाठी आपुलकीची पहाट हा कार्यक्रम बुधवारी घंटाळी येथे आयो जित केला आहे.ठाण्यातील विविध शाळांमधील तब्बल 60 दिव्यांग विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत असून त्यांना आपल्यातील विविध कलागुण दाखवण्याची संधी लाभणार  आहे.यात नृत्य,नाट्य,वेशभूषा आदींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असून या मुलांना दिवाळीचा फराळ व मिष्ठान्न आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात येणार आहे.या क ार्यक्रमाला स्थानिक नगरसेविका प्रतिभा मढवी,नगरसेवक सुनेश जोशी आदिसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून ठाणेकरांनीही या आपुलकीच्या पहाट आवर्जून उपस्थित  राहावे.असे आवाहन गौरव प्रतिष्ठानने केले आहे.
दीपावलीनिमित्त प्लास्टिक मुक्तीचा संदेश
दीपावलीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमाची रेलचेल असल्याने सर्वचजण दिवाळीचा जल्लोष करीत असतात.यात दिव्यांग मुलांनाही सहभागी होता येत नाही.यासाठी ठाणे गौरव प्र तिष्ठानच्यावतीने ही आपुलकीची दिवाळी पहाट आयोजित केली आहे.यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करताना पर्यावरण रक्षणासाठी या उपक्रमात प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला  जाणार असून ठाणेकरांना कापडी पिशव्याचे वाटपदेखील केले जाणार आहे.अशी माहिती डॉ.मढवी यांनी दिली.