विशेष इंद्रधनुष्य मोहिमेत सर्वांनी सहभाग घ्यावा-डॉ. दीपक सावंत
मालेगाव, दि. 09, ऑक्टोबर - बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लसीकरणाबाबात असलेले गैरसमज बाजूला सारून विशेष इंद्रधनुष्य मोहिमेत सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत केले.मालेगाव येथे आयोजित राज्यस्तरीय विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. डॉ.सावंत यांच्या हस्ते मालेगाव येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन आणि महिला व बाल रुग्णालय इमारतीच्या नुतनीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आरोग्य संचालक डॉ. संजीवकुमार, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना आदी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, राज्याने पेंटाव्हॅलेटमध्ये पाच लसी एकत्र केल्या असून पोलिओ लस, रुबेला, निमोनिया आदींचा या लसीकरणात समावेश आहे. या सर्व लसी मोफत देण्यात येतात. बालक अधिक सुदृढ होण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. लसीकरणाबाबत मालेगाव काहीसा मागे असून नागरिकांनी बालकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शहर आणि तालुक्यात इंद्रधनुष्य अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून पुढच्या वर्षी या अभियानात मालेगावने अग्रेसर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
नर्सिग महाविद्यालय, महिला व बालरुग्णालयासाठी मागणी केलेल्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मालेगाव येथे रक्तपेढीस मान्यता देण्यात आली असून त्यामुळे प्रसुतीदरम्यान होणारे माता मृत्यू कमी होण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.यावेळी भुसे म्हणाले की, राज्यस्तरीय मिशन इंद्रधनुष्यासाठी मालेगावची निवड सार्थ ठरवून शहरात मोहिमेची अंमलबजावणी तंतोतंत करण्यात येईल. महिला व बाल रुग्णालयाच्या नुतनीकरणासाठी अडीच कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी आरोग्यमंत्री सावंत व राज्यमंत्री भुसे यांच्या हस्ते नवजात बालकास लस देऊन राज्यस्तरीय विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांचे हस्ते इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेबाबत माहितीपटाचे अनावरण करण्यात आले. यासाठी योगदान देणार्या रोटरी क्लब सदस्य, आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी कर्मचार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील नांदेड, बीड, जळगाव, नाशिक, नंदुरबार, गडचिरोली, यवतमाळ, अहमदनगर, सोलापूर, ठाणे या जिल्ह्यात तर ठाणे, जळगाव, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, सोलापूर, बृहन्मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईदर, नांदेड महानगरपालिकांच्या क्षेत्रात ही मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत ऑक्टोबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहीलेले अथवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालाकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी चार विशेष मोहिमांचे नियोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ
महाराष्ट्रसह देशातील 23 राज्यांमध्ये राबविण्यात येणार्या विशेष मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमाचा राष्ट्रीय शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील वडनगर येथून झाला. याचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमास्थळी करण्यात आले.
विशेष इंद्रधनुष्य मोहिमेतून प्रत्येक लहान मुलांना शोधून लसीकरण केले जाईल. त्यामुळे भविष्यात कोणत्याही बालकांना त्रास होणार नाही. लसीकरण हे जन आंदोलनाचे रुप होत असून सामाजिक संस्थासह सर्वांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणात केले.
आरोग्यमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाला भेट
कार्यक्रमापूर्वी आरोग्यमंत्री सावंत यांनी जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशू विशेष दक्षता कक्षाला भेट देऊन करण्यात येणार्या सुधारणांची माहिती घेतली. यावेळी डॉ.सुशील वाकचौरे उपस्थित होते. डॉ.सावंत यांनी नवजात शिशू तज्ज्ञांची उपलब्धता होण्यासाठी त्यांचे मानधन वाढविण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती यावेळी दिली. रुग्णालयात नव्याने स्थापित करण्यात आलेल्या 6 बेबी वॉर्मरचीदेखील त्यांनी माहिती घेतली.