डॉ. आंबेडकर हे भारतमातेचे सर्वश्रेष्ठ पुत्र - मिलींद एकबोटे
पुणे, दि. 16, आक्टोबर - धर्मांतराची घोषणा केल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी 25 वर्ष देशातील हिंदू धर्मास सुधारण्याची संधी दिली. मात्र, हिंदू धर्मातील कर्मठ लोकांनी सुधारणा केली नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी गाडगेबाबांशी सल्लामसलत करून बौद्ध धर्मात प्रवेश केला. त्यांनी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला असता, तर आज देशात वेगळे चित्र दिसले असते. त्यांनी शांतीचा संदेश देणा-या भारतातीलच बौद्ध धर्मात शांततापूर्ण वातावरणात प्रवेश करून जगासमोर एकात्मतेचे उदाहरण ठेवले. त्यामुळे ते ख-या अर्थाने भारतमातेचे सर्वश्रेष्ठ सुपुत्र होते, असे प्रतिपादन समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलींद एकबोटे यांनी केले.
राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त समस्त हिंदू आघाडीच्यावतीने कर्वे रस्त्यावरील स्वा.सावरकर स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात एकबोटे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मिलींद कांबळे, नगरसेविका पल्लवी जावळे, सामाजिक कार्यकर्ते शेखर जावळे, महेश पवळे, सौरभ कर्डे, लोकेश कोंढरे, गोरक्षक शिवशंकर स्वामी, प्रशांत किराड, आशिष वरगंटे आदी उपस्थित होते. लोकशाही जागर मंडळाने डॉ.आंबेडकरांवरील गीत सादर केले.
मिलींद एकबोटे म्हणाले, बाबासाहेबांचे वडिल नाथपंथीय होते. त्यांच्या घरात भजन चालायचे, त्यामुळे त्यांचे लहानपण भक्तीमय वातावरणात गेले. त्यांच्यावर जे संस्कार झाले, त्या संस्कारांचा उपयोग त्यांना पुढील जीवनात झाला. सावरकर आणि आंबेडकर एकमेकांना पूरक होते. हिंदुत्त्व अबाधित ठेवताना देशातील अस्पृश्यांवर जो अन्याय झाला, तो दूर क रण्याचे काम सावरकरांनी केले. चवदार तळ्याच्या सत्याग्रहास बाबासाहेबांना सावरकरांनी सर्वप्रथम पाठींबा दिला, असेही त्यांनी सांगितले.
मिलींद कांबळे म्हणाले, बाबासाहेबांनी आयुष्यभर एकात्म भाव जपला. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास समाज एक करण्याच्या कार्यात गेला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर आधारित असलेला आणि भारताच्या मातीतील बौद्ध धर्म असल्याने त्यांनी तो स्विकारला. शेखर जावळे म्हणाले, बाबासाहेबांचे कार्य समाजासाठी होते. बडोद्यात काम करताना आलेल्या अनुभवानंतर त्यांनी समानतेची चळवळ हाती घेतली. समाजातील रुढी बदलण्याचा आणि सनातन लोकांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी सर्वप्रथम केला, असेही त्यांनी सांगितले.