ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण देण्यात देश अद्यापही मागे - विवेक ओबेरॉय
पुणे, दि. 16, आक्टोबर - ग्रामीण भागात घरातील कामे, बाजमजुर, बालविवाह अशा विविध कारणांमुळे मुली शिक्षणापासुन वंचित आहेत. ग्रामीण भागात मुलींना शिक्षण देण्यात आपला देश अद्यापही मागे आहे, अशी खंत अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी व्यक्त केली.
विद्यार्थी सेवा संघतर्फे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परीषदेत विवेक ओबेरॉय बोलत होते. यावेळी विद्यार्थी सेवा संघाचे कणव चव्हाण, माजी आमदार कृष्णा हेगडे, महेश तपासे आदी उपस्थित होते.
विवेक ओबेरॉय म्हणाले, तामिळनाडुत आलेल्या त्सुनामीमुळे पुनर्वसनाचे काम करताना सामाजिक कामाची जाणीव झाली. अभिनेता असल्यामुळे सामाजिक कामासाठीचा निधी व परवानग्यासाठी सोपे होते. शिक्षणातुन मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास शक्य आहे, हे सामाजिक कामातुन सिद्ध झाले. त्यादृष्टिने ग्रामीण भागात मुलींना शिक्षण देन्याची मानसिक ता निर्माण करण्याची गरज आहे.
प्रशासकिय व राजकीय प्रक्रियेमुळे सामाजिक कामात अडचणी येतात. त्यामुळे मी सरकारी मदत घेत नाही. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात मुलींच्या शिक्षणाचे काम सुरु आहे, त्यापद्धतीने महाराष्ट्रात असे काम करणार असल्याचे विवेक ओबेरॉय यांनी यावेळी सांगितले.
कणव चव्हाण म्हणाले, चांगले काम करणा-यांनी राजकरणात गेले पाहिजे, असे काही नाही. राजकारण व पदामुळे काम करणे सोपे होते. मात्र त्या कामाची मनापासून इच्छा असणे गरजेचे आहे.