Breaking News

अर्धनग्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह, जोडीदार फरार

पुणे, दि. 16, आक्टोबर - लोहगाव येथील खंडोबा माळ जवळील एका घरात 35 वर्षीय महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. या महिलेचा  संशयास्पद मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्या मृत महिलेचे नाव मीना असे असून तिचा जोडीदार सुरेश इंगवले (मूळ सांगोला, जि. सोलापूर) हा फरार आहे.  या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुरेश हा चर्‍होली येथील खाणीमध्ये माल वाहतूक करणार्‍या गाडीवर चालकाचे काम करत होता. 8 ऑक्टोबर रोजी लोहगावातील खंडोबा माळ येथील खांदवे यांच्या घरी तो भाड्याने  राहायला आला होता. खोली भाड्याने घेताना इंगवले याने मीना आणि तो नवरा-बायको असल्याचे खांदवे या घर मालकाला सांगितले. मीनाला रुमवर ठेऊन सुरेश गावी जातो  म्हणून निघून गेला होता. त्यानंतर शनिवारी सायंकाळी बाजूच्या खोलीमधून वास येऊ लागल्याने घर मालकांनी खिडकी उघडून पाहिले असता, अंगावर चादर घेऊन कोणी तरी  झोपले असल्याचे दिसले. संशय वाटल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.