Breaking News

सैनिकांच्या माता पित्यांचा गौरव करून दिवाळी साजरी

सटाणा, दि. 23, ऑक्टोबर - स्वतःच्या जीवावर उदार होऊन देशाच्या सिमारेषेची जबाबदारी घेणार्‍या जवानांच्या माता-पित्यांच्या गौरव करणे हीच खरी दिवाळी असल्याचे प्र तिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पगार यांनी व्यक्त केला आहे.
प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून आपल्या मुलांना देशाच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर पाठवणार्‍या माता पित्यांना बागलाण तालुक्यातील उत्राणे या गावात आदर्श माता-पिता पुरस्क ार देऊन गौरविण्यात आले. या सैनिक माता- पित्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी अ‍ॅड.रविंद्र पगार बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर याचे व्याख्याते अमोल मिटकरी, पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे सभापती यतीन पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख  दीपक पगार, पोलीस निरीक्षक गणेश गुरव, संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, डॉ. उज्ज्वल कापडणीस, डॉ. मोहन पगार आदी मान्यवर उपस्थित होते.
खेडेगावात अत्यंत हलाकीचे जीवन जगात असतांना आपल्या मुलांचे शिक्षण व विकासासाठी अहोरात्र कष्ठ उपसणार्‍या माता पित्यांचा पुरस्कार देऊन आयोजकांनी त्यांच्या कार्याचा  सन्मान केल्याचे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पगार यांनी यावेळी म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मोहन पगार, सूत्र संचलन देवदत्त बोरसे तर आभार अमोल  पाटील यांनी मानले.
देशसेवेसाठी कार्यरत असणार्‍या सैनिकांच्या माता पित्यांच्या सन्मान सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. या सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेणारे  व्याख्यान देखील संपन्न झाले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.