Breaking News

न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी श्रेयस, सिराजची निवड

मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - न्युझीलंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज मुंबईतील पत्रकार परिषदेत  संघाची घोषणा केली आहे. एक दिवसीय आणि ट्वेण्टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौर्‍यावर आहे. 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या काळात ट्वेण्टी-20 मालिका  रंगणार आहे. दिल्ली, राजकोट आणि तिरुवनंतपुरममध्ये हे सामने खेळवण्यात येणार आहेत.
भारतीय संघात दिनेश कार्तिक, रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, एमएस धोनी, शिखर धवन, केएल राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल,  यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, आशिष नेहरा, मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.