Breaking News

माऊंट मेरी चर्चजवळच्या इमारतीला भीषण आग आटोक्यात

मुंबई, दि. 24, ऑक्टोबर - वांद्रे पश्‍चिमेकडील माऊंट मेरी चर्चजवळच्या ‘ला मेर’ इमारतीच्या 13 व्या मजल्याला भीषण आग लागली. सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतर ही आग  आटोक्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यात कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात  येत आहे. चार फायर इंजिन (बंब) आणि चार वॉटर टॅन्करही घटनास्थळी दाखल झाले होते . आग कशामुळे लागली याबाबत माहिती मिळालेली नाही. आग लागलेली इमारत ही  उच्चभ्रूंची असून यापूर्वी तेथे सचिन तेंडुलकर आणि ऐश्‍वर्या राय-बच्चन राहत होते.