Breaking News

महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने गरिब महिलांना मिठाई व कपड्यांचे वाटप

बुलडाणा, दि. 24, ऑक्टोबर - शहरातील विविध ठिकाणी भटकणार्‍या गरिब आणि गरजु उपेक्षित महिलांना दिवाळीनिमित्त फराळ, मिठाई व साडीचे वाटप करुन खामगाव शहर  महिला काँग्रेस कमिटीने सामाजिक उपक्रम राबवुन दिवाळी सण साजरा केला. दि.20 ऑक्टोंबर रोजी येथील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात माजी नगराध्यक्षा अलकादेवी सानंदा  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुरजितकौर सलुजा, माजी नगराध्यक्षा श्रीमती  सरस्वतीताई खासने, भारती इंगळे, शहर काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजातील उपेक्षितांप्रती आपले काही देणे लागते. हा उदात्त हेतु डोळयासमोर ठेवून खामगाव शहर महिला काँग्रेसच्या वतीने गरिब, गरजु आणि अपंग महिलांना दिवाळीनिमित्त  मिठाई, फराळ व साडीचे वाटप करुन त्यांना दिवाळीची भेट दिली. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा अलकादेवी सानंदा यांनी या महिलांना दिवाळीनिमित्त पेढा भरवुन त्यांचे गोड केले. या  कार्यक्रमाला कृ.उ.बा.स.संचाल विलाससिंग इंगळे, माजी नगरसेवक गोविंद मिश्रा, पत्रकार अशोक जसवानी, युवक काँग्रेस ब्रिगेडचे शहर अध्यक्ष तुषार चंदेल, शिवाजी इंगळे  यांच्यासह महिला काँग्रेस कमिटीच्या सदस्या उपस्थित होत्या.