Breaking News

अभिनेत्याच्या घरावर जीएसटी पथकाचा छापा

चेन्नई, दि. 24, ऑक्टोबर - जीएसटी पथकाने सोमवारी तमिळ अभिनेता आणि निर्माता विशालच्या कार्यालयावर आणि प्रोडक्शन हाऊसवर छापा टाकला. विशालच्या प्रोडक्शन  हाऊसने जीएसटी कर भरण्यामध्ये अफरातफर केल्याचा संशय जीएसटी पथकाला आहे. त्यामुळे हा छापा टाकण्यात आला असल्याची माहिती आहे.
विशाल तामिळनाडू चित्रपट निर्माता कौन्सिलचा अध्यक्षही आहे. जीएसटी पथकाला विशालच्या प्रोडक्शन हाऊसकडून सर्व आवश्यक ती कागदपत्र देण्यात आल्याचं वृत्तही स्थानिक  वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. जीएसटीतून पळवाटा काढणार्‍यांचा शोध घेणं हे जीएसटी इंटेलिजेन्स टीमचं काम आहे.