Breaking News

सैनिकहो तुमच्यासाठी ! नगरसचिव कार्यालयाने पाठविला दिवाळी फराळ

पुणे, दि. 15, ऑक्टोबर - देशात सर्वत्र दिपावली सणाची चाहूल लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये घरापासून आणि कुटुंबियांपासून दूर राहून भारतीय सैनिक देशवासियांचे रक्षण करतात. त्यांच्या या कार्याचे स्मरण ठेवत महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाने भारत-चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या मराठा बटालियनच्या जवानांसाठी दिवाळी फराळ पाठविला आहे.
गुरुवारी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मराठा बटालियनचे जवान तुषार शेटे, भोंगवली, भोर यांना दिवाळी फराळ भेट म्हणून देण्यात आला. याप्रसंगी अशोक कांबळे, दत्तात्रय भंडारी, कैलास वाघ, निखिल बहिरट, अनंत निंबाळकर, बबन बिबवे, गजानन बोराटे, रविंद्र नितनवरे, चंद्रकांत भागणे, राजेश वाघमोडे, संजय घरत आदींसह नगरविकास कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.