छापा टाकून उपटली 700 किलो गांजाची झाडे
पुणे, दि. 15, ऑक्टोबर - जुन्नर तालुक्यातील पोलिसांनी छापा टाकून गांजा पिकवणार्या शेतकर्याचा पर्दाफाश केला आहे. शेतकर्याने खेटेपठार येथील डोंगरावर एक एकर शेतीत बाजरी आणि मक्याच्या अंतर पिकात गांजा पिकवल्याच उघड झाले आहे. पोलिसांनी 700 किलो गांजाची झाडे उपटली असून आरोपी शेतकर्याला ताब्यात घेतले आहे. एलसीबी आणि जुन्नर पोलिसांनी (शनिवार) दुपारी ही करवाई केली. पोलिसांनी दोन पिकअपमधील 50 ते 52 पेंढ्या जप्त केल्या आहेत.