Breaking News

सनबर्न फेस्टिव्हल : शासन आणि पोलीस प्रशासन यांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

पुणे, दि. 15, ऑक्टोबर - राष्ट्रध्वजाच्या आचारसंहितेप्रमाणे पालन न करता स्वतःच्या लाभासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करून तिरंग्याला विकृत स्वरूपात प्रदर्शित करणे हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान करणा-या ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजक आणि परसेप्ट लाईव्ह आस्थापन यांच्यावर शासन आणि पोलीस प्रशासन यांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ महिला संघटना यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी करण्यात आली. 
या आंदोलनामध्ये रणरागिणी शाखा आणि पंचक्रोशीतील समविचारी हिंदुत्वनिष्ठ महिला संघटनांच्या कार्यकर्त्या 100 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. हे आंदोलन येथील भोसरी .येथील पीएमपीटी चौकात पी.एम्.टी चौकात झाले. 2 ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीनिमित्त प्रसारीत (पोस्ट) करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये के.एस्.एच्.एम्.आर्. या अमेरिकेच्या डी.जे.च्या चिन्हाला (लोगोला) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही ध्वनीचित्रफीत 149 जणांनी ‘शेअर’ केली आहे. यापूर्वीही सनबर्न फेस्टिव्हलमध्ये तिरंग्याचा अयोग्य पद्धतीने वापर करून आचारसंहितेचा भंग करण्यात आला होता.