Breaking News

संगणक परिचालकांना न्याय मिळवून द्यावा : अ‍ॅड.जयश्रीताई शेळके

बुलडाणा, दि. 24, ऑक्टोबर - राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व ग्रा. पं. संगणक परिचालक सर्व जिल्हा प रिषदांसमोर उपोषण करीत आहेत. 12 ऑक्टोबरपासून सदर आंदोलन सुरु आहे, मागण्या मान्य होईपयर्ंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. राज्य  शासनाने सदर संगणक परिचालकांच्या मागण्या मंजूर करुन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महिला प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस तथा जि. सदस्या अ‍ॅड. जयश्रीताई शेळके यांनी  केली आहे.
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात काम करणार्‍या ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांना फेब्रुवारी 2017 पासून मानधन मिळालेले नाही. काहींचे तर डिसेंबर 2016 पासूनचे  मानधन थकले आहे, त्यामुळे संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात शेतकर्‍यांप्रमाणेच आता संगणक परिचालकांवर देखील आत्महत्या करण्याची वेळ आली  आहे. आपले सरकार सेवा केंद्राच्या शासन निर्णयातील जाचक अटींमुळे बर्याच संगणक परिचालकांवर बेरोजगारची कुर्‍हाड चालली आहे. संग्राम प्रकल्प संपल्यानंतर त्यातील सर्व  संगणक परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात सामावून घेण्याबाबत ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडून बरीच आश्‍वासने मिळाली परंतु प्रकल्प सुरु होऊन  एका वर्षाचा काळ लोटत आला तरी अद्यापही संगणक परिचालकांना नवीन प्रकल्पात सामावून घेण्यात आले नाही. प्रचंड अडचणी असतानाही संगणक परिचालकांनी छत्रपती  शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे अर्ज रात्र रात्र जागुन भरुन घेतले तरी देखील त्यांच्या कामाची दखल घेण्यास शासन तयार नाही. उलट टास्क कन्फर्मेशन सारखी  जाचक पद्धत सुरु करुन मानधन कपात केली जात आहे. त्यामुळे संणगक परिचालकांनी 12 ऑक्टोबरपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे.
मागण्या मान्य होईपयर्ंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. राज्य शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करुन त्यांना दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी जि. प. सदस्या अ ॅड. जयश्रीताई शेळके यांनी केली आहे. शासनाने यावर वेळीच तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.