Breaking News

दीनदयाल कनिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात पडोस युवा सांसद कार्यक्रम

देऊळगाव राजा, दि. 01, ऑक्टोबर - भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संगठन, बुलडाणाचे जिल्हा युवा समन्वयक डॉ.दत्ता  देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 28 सप्टेंबर रोजी देऊळगांवराजा येथे दीनदयाल कनिष्ठ कला व् विज्ञान महाविद्यालय येथील सेमीनार हॉलमध्ये  पडोस युवा सांसद  कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.वाय.फटींग होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलिस निरीक्षक अधिकारी सारंग नवलकार व प्रमुख पाहुने म्हणून सूर्योदय स्पर्धा  परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रल्हाद देशमुख उपस्थित होते.व कॉलेज चे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमात युवकांना निर्माण होणार्‍या  विविध  सामाजिक, आर्थिक व गावात युवकांच्या विकासासाठी निर्माण होणार्‍या समस्या इत्यादी विषयावर चर्चा करण्यासाठी नेहरू युवा केंद्र बुलडाणा मार्फत या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य फटिंग यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, पूर्ण श्रेद्धेने तसेच उंच आत्मविश्‍वासने युवकानी अभ्यास करावा. तसेच प्रल्हाद देशमुख नकारात्मक दृष्टिकोण  बाजूल ठेऊन सकारात्मक होण्याचे आवाहन युवकांना दिले या नंतर पोलिस निरीक्षक सारंग नवलकार यांनी युवकांनो सोशल मिडिया चा गैरवापर करू नका.असे  मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नेहरू युवा केंद्र तालुका समन्वयक ज्ञानेश्‍वर शिंगणे यांनी तर संचालन अश्‍विनी जायभाये हिने केले. तर आभार प्रदर्शन नेहरू युवा केंद्राचे तालुका  समन्वयक सचिन नागरे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतीतेसाठी दीनदयाल कनिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.